मुंबई – महान्यूज लाईव्ह
राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल उद्या म्हणजे गुरूवारी लागणार आहे. अर्थात १६ आमदार अपात्र झाले, तर सरकार जाणार का? आणि जर ते पात्र ठरले तर ठाकरे गटाच्या आमदारांचे काय होणार? यापैकी नेमके काय घडणार याची उत्सुकता आतापासूनच लागली आहे.
सर्वोच्च न्यायालयात तब्बल ९ महिने जी सुनावणी झाली. त्याचा निकाल आता उद्या सर्वोच्च न्यायालयाचे ५ न्यायमुर्तींचे घटनापीठ देणार आहे. संपूर्ण देशासाठी जसा हा निकाल महत्वाचा ठरेल, तसाच तो महाराष्ट्रात सरकार राहणार की जाणार यासाठीही महत्वाचे ठरणार आहे.
अर्थात निकाल कोणताही आला तरी, सध्या भाजप व शिंदेच्या सेनेकडे १६४ आमदार आहेत. राज्याच्या विधीमंडळातील २८८ सदस्यांमध्ये बहुमत १४५ आमदारांचे असून जर १६ आमदार अपात्र झाले, तरी बहुमत भाजप-सेनेचे राहणार आहे.
याचे कारण म्हणजे १६ अपात्र झाले, तरी भाजप-सेना आमदारांचे संख्याबळ १४४ होईल. दुसरीकडे १६ आमदार वजा केल्यास एकूण आमदारांची संख्या २७२ व त्यामधील बहुमत १३७ आमदारांचे राहील. त्यामुळे ते बहुमत गमावणार नाहीत.
दुसरीकडे अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत, दोन्ही गटांनी आपापल्या न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी निकाल आमच्याच बाजूने लागणार असल्याचे पत्रकार परीषद घेऊन स्पष्ट केले आहे.