फलटण : महान्यूज लाईव्ह
काही दिवसांपूर्वीच भाजपचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना आव्हान देताना माझ्या विरोधात हिम्मत असेल तर लोकसभेची निवडणूक लढून दाखवा असे आव्हान दिले होते. ते आव्हान आज राष्ट्रवादीने स्वीकारले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज फलटणच्या जाहीर सभेत माढ्यासाठी यंदा रामराजे लढणार असे जाहीर करतात टाळ्यांचा कडकडाट झाला.
2024 ची लोकसभा जशास तसी लढण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज फलटणमध्ये विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची जाहीर सभा झाली आणि या सभेत रामराजे नाईक निंबाळकर हे माढ्याच्या लोकसभेसाठी मविआचे उमेदवार असतील असे अजित पवार म्हणाले. साहजिकच सन 2024 ची माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दोन राजांमध्येच होणार हेच आता स्पष्ट झाले आहे.
महाविकास आघाडी कडून रामराजे नाईक निंबाळकर विरुद्ध भाजप शिवसेना युतीकडून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर अशीच लढत होणार हे आज निश्चित झाले. दोन राजे लढणारी ही निवडणूक यंदा सर्वांचाच कसोटी पाहणारी ठरेल, मात्र त्यापेक्षाही आर या पारची लढाई यातून होईल असेच संकेत मिळत आहेत.