नगर: महान्यूज लाईव्ह
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी चा तडाखा बसला असून अजूनही विशेषतः सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांमध्ये १० मे पर्यंत पाऊस राहणार आहे.
गेल्या दोन-तीन दिवसापासून हा अवकाळी चा तडाका सुरू असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी एप्रिल व मे महिन्यात अवकाळीचा सर्वाधिक फटका राज्याला बसलेला आहे. याचा परिणाम मोसमी पावसावर होऊ नये अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असून जर मोसमी पाऊस कमी झाला तर काय करायचे? याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
दरम्यान हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या मते ९ व १० मे या दरम्यान सातारा, सांगली, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर, पंढरपूर, कोकण किनारपट्टी, अकलूज, माळशिरस, लातूर, रत्नागिरी, रायगड या भागामध्ये पाऊस पडेल. मात्र १० मे ते १६ मे च्या दरम्यान विदर्भामध्ये पूर्ण हवामान कोरडे राहणार आहे. त्यामुळे कांदा काढण्याचा अंतिम टप्पा शेतकऱ्यांना पूर्ण करता येईल. 17 मे नंतर पुन्हा संपूर्ण राज्यात अवकाळी चा फटका बसण्याची चिन्हे आहेत.