इंदोर: महान्यूज लाईव्ह
मध्यप्रदेश मधील छत्रपूर येथील गौरीशंकर मंदिरातील ही घटना. या घटनेने साऱ्या देशाचे लक्ष स्वतःकडे वळवले आहे, कारण धिरेंद्र आचार्य या ठिकाणी राम कथेचे वाचन करणार होते, पण त्यांच्या शिष्याने या राम कथेचे आयोजन केलेल्या आयोजकाच्या पत्नीलाच पळवून नेले. आणि सगळीकडे खळबळ उडाली.
नरोत्तमदास दुबे असे या शिष्याचं नाव आहे. या शिष्याने यजमानाच्या पत्नीलाच पळवून नेल्याने राम कथा ऐवजी आयोजकाला कोतवाली पोलीस ठाणे गाठावे लागले. तेथे नरोत्तमदास याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
या रामकथेदरम्यान नरोत्तमदास दुबे याने महिलेला प्रेमाच्या जाळ्यात फसवले. तिचा नंबर घेतला. त्यानंतर या दोघांमध्ये मोबाईलवर संभाषण व्हायला लागली आणि पाच एप्रिल रोजी नरोत्तम दास दुबे याने आपल्या पत्नीला पळवून नेले असा आरोप राहुल तिवारी यांनी केला. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासादरम्यान तिवारी यांची पत्नी सापडली, पण या पत्नीनेच राहुल तिवारी यांच्या सोबत राहण्यास नकार दिला.