दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अश्पाक उर्फ लाला कासम कुरेशी (वय 42 वर्षे राहणार खाटीक गल्ली) याने स्वतःची एक टोळी तयार केली असून या टोळीच्या माध्यमातून तो सातत्याने महाराष्ट्र प्राणी संवर्धन कायदा आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत बेकायदेशीर कृत्य करत असल्याने व त्याच्या टोळीची दहशत निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी त्याच्या टोळीस एक वर्ष तडीपार केले आहे.
या अंतर्गत अश्फाकसह आसिफ काशीम कुरेशी वय 41 वर्ष, वाजिद सादिक कुरेशी वय 28 वर्ष, कयूम शब्बीर कुरेशी वय 35 वर्ष, बाब्या उर्फ इमरान इब्राहिम कुरेशी वय 35 वर्ष, इद्रीस आबिद कुरेशी वय ४० वर्ष व तन्वीर इस्माईल कुरेशी वय 23 वर्ष या सात जणांना 6 मे 2023 पासून श्रीगोंदा व कर्जत तालुका, पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीसह एक वर्ष या कालावधीसाठी तडीपार करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना या संदर्भातील प्रस्ताव दौंडचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी सादर केला होता. त्यानुसार महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अंतर्गत हा हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांनी मंजूर केला.