महसूल विभागाचा पुणे जिल्हा आदर्श तलाठी पुरस्कार बाबुर्डीच्या श्री. सुरेश जगताप यांना प्रदान.
सचिन पवार : महान्यूज लाईव्ह
जिल्ह्यात एकच तलाठ्याला उत्कृष्ट कामगार तलाठी म्हणून मान मिळतो. बारामती ला गेली बारा वर्ष हा मान मिळाला नव्हता, परंतु बाबुडी गावचे तलाठी सुरेश जगताप यांनी केलेल्या प्रशासकीय कामकाजामुळे बारामतीला हा मान मिळाला आहे. बाबुर्डीचा तलाठी आता पुणे जिल्ह्यात भारी ठरला आहे.
महसूल विभागाचा पुणे जिल्हा आदर्श तलाठी पुरस्कार बाबुर्डी गावचे तलाठी श्री. सुरेश जगताप यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानिमित्त देण्यात आला. सातबारा संगणीकरण कामकाज 100 टक्के पुर्ण, कऱ्हा नदीला पुर आल्यानंतर आपत्ती व्यवस्थापनच्या कामकाजामध्ये नुकसाग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे वेळेत पूर्ण करून महाराष्ट्र सरकारचे अनुदान मिळवून देणे, कोविड काळात उल्लेखनीय कार्य अशा प्रकारच्या विविध उल्लेखनीय कार्याबद्दल श्री. जगताप यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता.
हा पुणे जिल्हा आदर्श तलाठी पुरस्कार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानिमित्त पुणे येथे देण्यात आला. हा सन्मान बारामती तालुक्याला 12 वर्षानंतर मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातून हा एकमेव पुरस्कार बारामती तालुक्यातील बाबुर्डी गावचे तलाठी श्री. सुरेश जगताप यांना मिळाल्याने बारामती तालुक्यातून श्री. जगताप यांचे कौतुक होत आहे.
श्री. जगताप यांनी 17 वर्षे भारतीय सेनेत कर्तव्य बजावले आहे. त्यानंतर ते तलाठी म्हणुन सेवा बजावत आहेत. बारामतीचे प्रांत अधिकारी, तहसीलदार यांनीही श्री. जगताप यांचे कौतुक केले.
श्री.ज्ञानेश्र्वर पोमणे- सरपंच बाबुर्डी- पुणे जिल्ह्यातून महाराष्ट्र शासन महसूल विभागाचा दिला जाणारा हा एकमेव आदर्श तलाठी पुरस्कार बाबुर्डी गावचे तलाठी श्री. सुरेश जगताप यांना मिळाल्यानंतर अतीशय आनंद झाला. त्यांचे कामकाज अतिशय चोख आणि गावातील सर्व नागरिक, शेतकऱ्यांना सहकार्याचे असते. त्यांचे गावच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन.
सौ.वनिता लव्हे – पोलीस पाटील– बाबुर्डी गावचे तलाठी श्री. सुरेश जगताप यांना महाराष्ट्र शासन महसूल विभागाचा दिला जाणारा हा आदर्श तलाठी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.