• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऊसाला पाच हजार रुपये प्रति टन दर, शेतकऱ्यांना नफा ठरवण्याचा व मागण्याचा अधिकार मिळालाच पाहिजे…

Maha News Live by Maha News Live
May 5, 2023
in सामाजिक, सुरक्षा, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, राष्ट्रीय, राज्य, रोजगार, पश्चिम महाराष्ट्र, व्यक्ती विशेष, Featured
0

युवराज जाधव, सांगली

ऊसाला पाच हजार रुपये दर मिळावा, सर्व शेतमाल नियंत्रण मुक्त करावा आणि शेतकरी विरोधी कायदे रद्द करा या मागण्यांसाठी आज ३७ वी जनजागृती सभा शिराळा तालुक्यातील मांगले येथे पार पडली. 

यावेळी शेतकऱ्यांना संबोधित करताना शिवाजी माने म्हणाले, शेतकरी सोडून सर्व व्यावसायिक व उद्योजकांनी आपण स्वतः केलेल्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरती नफा किती घ्यायचा, हे सरकारकडून स्वातंत्र्य मिळवले आहे. मग 142 कोटी जनतेची भूक भागवून, जगामध्ये अन्नधान्य निर्यात करण्याची क्षमता असणाऱ्या शेतकऱ्याला, स्वतःच्या शेतामधून निघणाऱ्या शेतमालाचा नफा ठरवण्याचे स्वातंत्र्य गेल्या 75 वर्षात का मिळाले नाही ? हे सर्व परिशिष्ट नऊ मध्ये असणाऱ्या शेतकरी विरोधी कायद्यांमुळे शेतमालावरती नियंत्रण आहे. 

उसाची एफ आर पी हा कायदा सुद्धा शेतकऱ्यांना दुष्ट चक्रात अडकवण्याचा कायदा आहे. माझ्या मिळणाऱ्या शेतमालाच्या उत्पन्नातून, माझ्या शेती उत्पादनाचा खर्च भागून त्यावरती नफा मिळवून, मला माझा कुटुंब चरितार्थ चालवता आला पाहिजे, इतका दर मागण्याचा अधिकार शेतकऱ्यांना मिळावा, यासाठीच नको एफ आर पी हवी एम आर पी हे अभियान घेऊन तुम्हाला 20 मे रोजी सांगली येथे होणाऱ्या ऊस दर परिषदेचे निमंत्रण देण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. 

देशामध्ये लेबर सिक्युरिटी ॲक्ट प्रमाणे फार्मर सिक्युरिटी करा, कारण आपली सर्व संपत्ती मोकळ्या रानावर, आभाळाखाली ठेवण्याचे धाडस फक्त शेतकऱ्यांमध्येच आहे. याला तो नैसर्गिक आपत्तींपासून, व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या लुटीलाही आजपर्यंत सामोरे जात आला आहे. शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढली, तरच देशाची क्रयशक्ती वाढते. 1950 ला शेतीचा जीडीपी दर 50 टक्के होता. मग आज एवढ्या सोयी सुविधा येऊन, उत्पन्नामध्ये वाढ घेऊन सुद्धा शेतीचा जीडीपी सात ते आठ टक्के इतक्या खाली आला. हे सर्व शेतकऱ्यांना कायद्याच्या बंधनात अडकल्यामुळेच घडत आहे. 

सहकार कायदा कलम 48 अ मुळे शेतकऱ्यांना रात्रंदिवस कष्ट करून पिकवलेल्या उसाचे पैसे त्याच्या परस्पर बँकेला व सोसायटीला जात असतात. असा कायदा कोणत्याही उद्योगपतींना व व्यावसायिकांना नाही. त्यामुळेच बरेच उद्योगपती पळून गेलेले आहेत. शेतकरी स्वतःची जमीन घेऊन कुठेही पळून जाऊ शकणार नाही. 

तो कायमच आपल्या काळ्या आईची इमानेइतबारे सेवा करून जगाची भूक भागवत आहे. असे असताना त्यालाच कायद्याच्या जोखडात अडकवून, त्याच्या भोवतीचा फास आवळला जात असल्यामुळे, शेतकरी फासावर जात असल्याचे दिसून येते. आजपर्यंत शेतकऱ्याच्या नावावर व्यापाऱ्यांनी, राज्यकर्त्यांनी, दलालांनी सगळ्यांनी आपली घरे भरून घेतली. काही शेतकरी नेत्यांनीही आपली घरे भरून घेतली. शेतकरी मात्र गरीबच होत राहिला असा आरोप शिवाजी माने यांनी केला. 

यावेळी ऊस दर अभियान समितीचे निमंत्रक रावसाहेब ऐतवडे यांनी, आमच्या शेतमालाला दर मिळत नसल्यामुळे आम्ही बँकांची कर्ज फेडू शकत नाही, विज बिल भरू शकत नाही, यासाठी ऊसाला पाच हजार रुपये दर मिळाला पाहिजे अशी मागणी केली. 

यावेळी त्यांनी जागतिक बाजारामध्ये असणाऱ्या साखरेचा मागील पंधरा वर्षातील हिशोब सांगून, यावर्षी जगामध्ये साखरेचा तुटवडा असल्यामुळे, आपल्या देशातील गरजे इतकी साखर ठेवून, उर्वरित साखरेवरील निर्यात बंदी उठवावी व भारतातील शेतकऱ्याला कधी नव्हे ते ऊसाला दर मिळण्याची आलेली संधी सरकारने द्यावी, अशी मागणी केली. 

शेतकऱ्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वीज मंडळांने वाढवलेली पोकळ थकबाकी संपूर्ण माफ करून, शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज द्यावी व शेती अनुषंगिक असणारी सर्व कर्जे सरकारने माफ करावीत, या मागण्यासाठीच शेतकऱ्यांनी आपले गट, तट विसरून सांगली येथील मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. 

यावेळी कांदे गावचे एन पी पाटील, मौजे डिग्रजचे उदय पाटील, जय शिवरायचे शितल कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब पाटील यांनी आभार मानले. यावेळी उत्तम गावडे, संभाजी दशवंत, विठ्ठल चौगुले, विनायक पाटील, युवराज देशमाने, प्रदीप मोहरेकर, उदय चौगुले, विलास कोकाटे, सतीश पाटील आदींसह जय शिवरायचे भैरवनाथ मगदूम, महेश मोहिते, बजरंग अवघडे व शेतकरी उपस्थित होते.

Next Post

शरद पवारांच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा नामंजूर होणार? प्रफुल पटेल मांडणार प्रस्ताव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group