राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : भीमा सहकारी साखर कारखाना हा कर्नाटक येथील निराणी ग्रुपला चालवायला दिल्यानेच आज महाराष्ट्र दिन व कामगार दिन असतानाही ध्वजारोहण करण्यात आला नाही. कारखान्यावर कर्नाटकी माणसे काम करीत असल्याने त्यांनी ध्वजारोहण केले नाही. अशी बोचरी टीका भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष यांनी भाजप आमदार आणि कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांच्यावर केली आहे.
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष , कारखान्याचे माजी संचालक नामदेव ताकवणे यांनी 26 एप्रिल रोजी वरवंड येथे खासदार संजय राऊत यांच्या पार पडलेल्या पोलकोल सभेत कारखान्याचे आदेशाने आमदार राहुल कुल यांना तुम्ही भ्रष्टाचार केला नसेल तर त्याचे पुरावे घेऊन मी एक मे रोजी भीमा पाटस कारखाना स्थळावर संस्थापक अध्यक्ष मधुकाका शितोळे यांच्या पुतळ्यासमोर येऊन बसतो, तुम्ही कारखान्यात भ्रष्टाचार झाला नाही हे सिद्ध करा असे खुले आव्हान ताकवणे यांनी कारखान्याचे अध्यक्ष, आमदार राहुल कुल यांना केले होते. त्यानुसार ते कारखान्यावर आले.
मात्र आज १ मे हा महाराष्ट्र दिन व कामगार दिन राज्यात सर्वत्र साजरा केला जात असताना भीमा पाटस सहकारी साखर कारखाना हा त्याला अपवाद ठरला, म्हणत कारखाना स्थळावर असलेल्या ध्वजाचे ध्वजारोहण केले नसल्याने नामदेव ताकवणे यांनी यावेळी संताप व्यक्त केला.
यावेळी बोलताना ताकवणे म्हणाले की, हा कारखाना कर्नाटकच्या निराणीला चालवायला दिला असून या कारखान्यावर कर्नाटकी कामगार काम करत आहेत, त्यामुळेच कारखान्यावर आज ध्वजारोहण करण्यात आले नसावे, २६ एप्रिल रोजी खासदार संजय राऊत यांनी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय मधुकाका शितोळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्याने कामगार संघाच्या अध्यक्ष व कामगारांनी विकृत बुद्धीने गोमूत्र व दुधाचा अभिषेक करून शुद्धीकरण केले. त्याच कामगाराचे अध्यक्ष व कामगारांना आज कामगार दिनानिमित्त कारखान्यात ध्वजारोहण करण्यास विसर पडला अशी टीका त्यांनी कामगार संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष कामगारांवरही केली.