बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत आज महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अधिकाऱ्यांचा सत्कार करतेवेळी अचानक मध्येच कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार यांना एक चिठ्ठी आली. त्यामधील मजकूर असा होता की, बारामतीत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा लागेल.. मग त्या चिठ्ठीचा समाचार अजितदादा स्टाईलने घेतला गेला..!
अजितदादा म्हणाले, मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी चिठ्ठी आली आहे. आता मी काय करतो.. मी साहेबांना सांगतो, की साहेब तुम्ही कुत्र्यांकडे पाहता का जनावरांकडे पाहता? जर साहेब म्हणाले.. अजित मी जनावरांकडे बघतो.. तर मग मी कुत्र्यांकडे बघेन आणि सुप्रियाला सांगतो तू बाकीचे बघ.. अरे काय चेष्टा लावली का?
बारामतीत मध्यंतरी एका दीड वर्षाच्या मुलीला भटक्या कुत्र्यांनी चावे घेऊन जखमी केले. त्या पार्श्वभूमीवर ही चिठ्ठी आली होती. याची मजकूर अगोदर लक्षात घेऊन अजित दादा यांनी वरील उत्तर केले, मात्र काहीच क्षणात त्यांनी पुन्हा याचे गांभीर्य लक्षात घेऊन बारामतीत मांजरापोळाची व्यवस्था करण्याची सूचना केली. त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर कुत्र्यांची नसबंदी करणे अथवा कुत्र्यांसाठी स्वतंत्र वार्ड तयार करणे अशा प्रकारच्या सूचना देखील अजित पवार यांनी दिल्या.
मी एका झटक्यात सर्वांचं बंदोबस्त करेल. मात्र बारामती पूर्वी ज्याप्रमाणे कोंडवाडा किंवा पांजरपोळ होते तशा स्वरूपाची व्यवस्था करा. मी पालकमंत्री असताना पुण्यामध्ये अशाच स्वरूपाची काही व्यवस्था पुण्यामध्ये केली होती, तशा स्वरूपाची बारामतीत व्यवस्था करावी अशी सूचना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.