विकीसाठी आणलेल्या ५३ हजार रूपये किमतीची देशी दारूसह ८ लाख ३ हजाराचा मुद्दे माल व वाहन जप्त… भुईंज पोलीसांची धडक कारवाई
दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
याबाबत भुईंज पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जांब (ता. वाई) येथे यात्रेनिमित्त देशी दारूची विक्री होणार असल्याची माहिती भुईंज पोलीसांना मिळाली. २९ एप्रिल रोजी जांब येथील संतोष बारच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत महिंद्रा पिकअप बलोरो गाडी (नं. MH 12 LT 6867) मध्ये बेकायदेशीर देशी दारू विक्रीसाठी ठेवली असल्याची माहिती मिळाली.
मग भुईंज पोलीसांनी तानाजी गणपत शिंदे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकून ५३ हजार ७३० रूपयांची देशी दारू जप्त करून पिकअप चालक राहुल विलास शिंदे (वय ४३ रा. जांब ता.वाई) यास भुईंज पोलीसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे
करीत आहेत.
जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जाणवे खराडे यांनी भुईंज पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, फौजदार रत्नदीप भंडारे, पोलीस अंमलदार राजकुमार किर्दत, जितेंद्र इंगुळकर, राजाराम माने, सुशांत धुमाळ यांनी केलेल्या कारवाईसाठी त्यांचे अभिनंदन केले.