शरद पवार यांच्या च्या मार्गदर्शनाखाली उत्तम पद्धतीने काम चालू आहे याची पुन्हा एकदा पोचपावती आम्हाला मिळाली ::आमची सर्वांची जबाबदारी वाढल्याचं अजितदादांचं मत!
विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर व सर्व १८ जागा राष्ट्रवादीने जिंकल्यानंतर पत्रकारांची संवाद साधला.
त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी चांगल्या पद्धतीचा कौल आमच्या शेतकरी वर्गाने ग्रामपंचायतच्या सदस्यांनी सोसायटीच्या सदस्यांनी दिलेला आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी पण मेहनत घेतली. मतदारांनी त्यांचं काम योग्य पद्धतीने बजावलं. उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा काम केलं. आमच्या कार्यकर्त्यांनी पण मेहनत घेतली.
खूप मोठा विश्वास जी बारामतीमध्ये परंपरा आहे. ८० ते ८५ टक्के मतं खासदारकी असो,आमदारकी असो, जिल्हा परिषद असो किंवा अशा प्रकारची मार्केट कमिटीची निवडणूक असो, अशाप्रकारे मत मिळत असतात. अपवाद फक्त माळेगाव सहकारी साखर कारखाना आहे. पण बाकीच्या सोमेश्वर सहकारी साखर कारखाना.बारामती सहकारी बँकेमध्ये, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये,नगरपालिकेमध्ये देखील अशाच प्रकारचा कौल बारामतीकर देत असतात. त्यामुळे आम्हाला समाधान मिळतं आणि त्याच्यामुळे अधिक जोमाने आम्ही सगळेजण काम करत असतो.
आता नवीन टीम आलेली आहे. मागील फक्त दोनच उमेदवारांना संधी दिली होती. बाकीचे सगळे नवनिर्वाचित आहेत. सगळे मिळून मार्केट कमिटीचे काम जे आपल्या बारामतीची परंपरा आहे. शेतकऱ्यांनी जो विश्वास टाकलेला आहे.व्यापारी वर्गाने किंवा हमाल मापाड्यांनी जो विश्वास टाकलेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचेच मनापासून आभार मानतो.विशेषतः मतदारांना लाख लाख धन्यवाद देतो.
मी केलेल्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिला. माझ्या सगळ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि आज हा उत्तम प्रकारचा निकाल मी बारामती मध्ये असताना मला ऐकायला मिळाला.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, मार्केट कमिटीचे मतदार वेगळे असतात.आमदारकी,खासदारकीला सगळे मतदार असतात.जिल्हा परिषदेला ग्रामीण भाग मतदार असतो. नगरपालिकेला महानगरपालिकेला शहरी भाग मतदार असतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे मतदार असतात. त्यामुळे आम्ही बारामतीमध्ये शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उत्तम पद्धतीने काम करतो. याची पुन्हा एकदा पोचपावती आम्हाला मिळालेली आहे. त्यामुळे आमची सर्वांचे जबाबदारी अधिक वाढलेली आहे. ती जबाबदारी आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडू असे अजित पवार म्हणाले.