इंदापूरसारखं मतदान कोणी पाहिलंच नाही.. आप्पासाहेब जगदाळे बनले हिरो.. पुरंदर मध्ये भाजप शिवसेनेचा सुपडासाफ.. दौंड मध्ये कुल थोरात यांना लोकांनी खेळवलं..!

राजेंद्र झेंडे, सुरेश मिसाळ, विक्रम वरे,

बारामती मध्ये बाजार समितीच्या निवडणुकीत अगोदर आलेली बिनविरोध एक जागा व उर्वरित 17 जागा अशा सर्वच्या सर्व जागा जिंकत बारामती मध्ये राष्ट्रवादीने पुन्हा वर्चस्व अधोरेखित केले. पुरंदर मध्ये मात्र महाविकास आघाडीने लोकसभेला इच्छुक असलेल्या विजय शिवतारे यांना मोठा धक्का दिला. या ठिकाणी सर्वच्या सर्व 18 जागा काँग्रेस राष्ट्रवादी व ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीने जिंकल्या. दौंड मध्ये मात्र रमेश थोरात यांना मोठा धक्का बसला, तरी देखील मतदारांनी मात्र राहुल कुल – रमेश थोरात कोणालाच समाधानी ठेवलं नाही. दोघांनाही समसमान नऊ जागा मिळाल्या.

दौंड मध्ये ग्रामपंचायतच्या प्रवर्गात भरभक्कम वर्चस्व मिळवल्यानंतर कुल गटाने राष्ट्रवादीच्या मातब्बर बालेकिल्ला असलेल्या सोसायटीच्या प्रवर्गात देखील दणका दिला. ही बाजार समिती आपलीच.. अशा हवेत राष्ट्रवादीचे नेते होते, मात्र राष्ट्रवादीला राहुल कुल यांच्या शांतीत क्रांती करण्याच्या व्यूहरचनेने मोठा धक्का दिला. थोरात यांनी पक्षाची लाज राखली असली तरी देखील मत फेर मतमोजणी एक उमेदवार भाजपच्या कुल गटाचा कमी झाल्याने समसमान जागा मिळाल्या.

अर्थात ग्रामपंचायत व सोसायटीतही एकूण दहा जागी भाजपचे उमेदवार निवडून आले होते. मात्र एका ठिकाणी फेरमतमोजणी घेतल्यानंतर थोरात गटाचा उमेदवार विजयी झाला. त्यामुळे येथील एकूण जागांची स्थिती समसमान झाली आहे. हा राष्ट्रवादीला मोठा धक्का आहे. नुकतीच येथे खासदार संजय राऊत यांची मोठी सभा झाली होती, त्याचे मतात रुपांतर करण्यात राष्ट्रवादी अपयशी ठरली. त्यातच जसे निवडणुकीच्या निकाल लागू लागले, तसतसा भाजपचा उत्साह वाढत गेला आणि कार्यकर्त्यांनी संजय राऊत मुर्दाबाद च्या घोषणा दिल्या.

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आघाडीचा अठरा जागांवर विजय झाला आहे. विजय शिवतारे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसनेच्या सर्व जागांवर पराभव झाला असून महविकास आघाडीने आपला गड राखला आहे. पुरंदर तालुका आणि बारामती तालुक्यातील 22 गावांमध्ये कार्यक्षेत्र असलेल्या या बाजार समितीवर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि पुरंदरचे आमदार संजय जगताप यांची एकहाती सत्ता मागील काळात होती. यावेळेस सुद्धा आपली सत्ता राखण्यास त्यांना यश आले या निवडणुकीत सर्वच्यासर्व म्हणजे 18 जागांवर आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत

इंदापूर बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी आज उशिरा सुरू झाली. या निवडणुकीत अप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने अगोदरच चार जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. उर्वरित १४ जागांसाठी निवडणूक झाली. त्याची मतमोजणी सुरू होती. अप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने येथे बाजी मारली जगदाळे यांच्या नेतृत्वाखालील मध्ये राष्ट्रवादी व भाजपचेही उमेदवार होते या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटाचा एक पॅनल उभा होता त्याच्या सर्व जागा पराभूत झाल्या आहेत.

इंदापूर तालुक्याच्या बाजार समितीच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य असे की, पॅनल टू पॅनेल अशी मते पहिल्यांदाच पाहायला मिळाली आहेत. सर्व उमेदवारांना एकसारखी मते मिळाल्याने येथे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकूणच या निवडणुकीची तटबंदी किती मजबूत होती हे दाखवणारा हा निकाल असल्याचे मानले जात आहे.

Maha News Live

Recent Posts

मोदीसाहेब, तुमचा टेलीप्रॉम्टर तपासा… खरंच सांगा शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला?

बारामती : महान्यूज लाईव्ह गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सभा वाढवल्या. या…

1 day ago

पेशव्यांचे सावकार, बारामतीचे विकासपुरुष – बाबुजी नाईक

उन्हाळ्याच्या बोधकथा - २ घनश्याम केळकर : महान्यूज लाईव्ह बारामतीतील सिद्धेश्वर मंदिर तसेच काशीविश्वेश्वर मंदीर…

3 days ago