विक्रम वरे महान्यूज लाईव्ह
गड्या, आपला गावचं बरा.असे अलीकडच्या काळात सर्वानाच वाटू लागले आहे. गावातील मुख्य चौकात झाडाखाली, तसेच मंदिरांच्या बाहेर पारावर बसून गप्पागोष्टी करण्याची एक आगळीवेगळी संस्कृती खेड्यागावात पहावयास मिळते.
सकाळी एकदा गप्पांची मैफिल जमली की ऊन डोक्यावर येईपर्यंत गप्पा पारावर रंगतात.गावचे प्रश्न, राजकारण, शेतीची कामे, खबरबात, दुःखद प्रसंग अशा अनेक विषयावर चर्चा होण्याचे ठिकाण म्हणजे गावचा पार.
अभिनेते किरण माने सध्या प्रसिद्धी झोतात आहेत. ‘बिग बॉस मराठी सीजन ४’ने त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली आहे. शालेय जीवनातच त्यांना नाटक आणि नाटकांमध्ये अभिनय करण्याची आवड होती. आपल्या कठोर परिश्रमाने आणि जिद्दीने वैभवाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला आहे. त्यांच्या सोशल मीडियामधील लेखांचा, अनुभवाचा एक चाहता वर्ग झाला आहे. किरण माने काय पोस्ट करणार याकडे आता नेटकऱ्यांचे लक्ष असते.
किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये, ‘…ह्यो माझा लै आवडता छंद ! गावाकडच्या पारावर बसलेल्या जुन्या खोडास्नी बोलतं करून ऐकत र्हायचं. दुनियेभरचं ग्यान मिळतं. गावातले सिसिटीव्ही कॅमेरेच. गांवात कायबी घडूदे. कुठल्याबी घटनेची ग्राऊंड रिॲलिटी हितं पारावर कळते. नादखुळा भन्नाट गप्पांची जी मैफल इथं जमून येते त्यातली मज्जा ऑनलाईन मिटींग आनि चॅटिंगची सवय लागलेल्या आपल्या पिढीला कळनार नाय.
समृद्ध जगण्याला मोबाईलनं न गिळलेली ही शेवटची पिढी ! प्रत्येक गावात अशी मोजकी जुनी खोडं शिल्लक हायत… जाताना जगण्यातलं लाखमोलाचं असं लै कायतरी सोबत घिवून जानारेत… नंतर आपन खर्या अर्थानं पोरके आणि कंगाल होनार आहोत !
…इस रास्ते में जब कोई साया न पाएगा,
ये बुढा सा आख़िरी पेड बहुत याद आएगा ! -किरण माने
अशी पोस्ट करत किरण माने यांनी गावाकडच्या पारावरची आठवण करून दिली आहे.