बारामती : महान्यूज लाईव्ह
इंदापूरचे माजी आमदार राजेंद्रकुमार घोलप यांच्या कन्या व बारामती पंचायत समितीच्या माजी सदस्या संगीता ताई ढवाण पाटील यांच्या आज अल्पशा आजाराने निधन झाले.
छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप व अमरसिंह घोलप हे त्यांचे बंधू होत. संगीता ढवाण या बारामतीमध्ये विविध सामाजिक व राजकीय संस्था व क्षेत्रात कार्यरत होत्या. बारामतीच्या पंचायत समिती सदस्या तसेच कल्याणी नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षा व एन्व्हायरमेंटल फॉर्म ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्या त्या क्रियाशील सदस्य होत्या.