सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील काटी गावातील ही घटना आहे आणि फिर्यादी आहे फलटण तालुक्यातील साठे फाटा येथील! लग्नात ठरलेला पाच लाख रुपयांचा हुंडा न देता नवऱ्या मुलीशी परस्पर पळून जाऊन लग्न केले म्हणून चिडलेल्या सासरकडच्यांनी नवरदेवाला मानवी विष्ठा खाण्यास भाग पाडले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने इंदापूर पोलिसांनी तालुक्यातील काठी येथील ११ जणांवर गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी स्वप्नाली शिंदे, दीदी पवार, वंदना शिंदे, मंदा काळे, दिनेश शिंदे, बापूराव शिंदे, कासलिंग शिंदे, अजय पवार, लखन काळे (सर्व रा. काटी, ता. इंदापूर), अतुल काळे (रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) या ११ जणांच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी फलटण तालुक्यातील साठेफाटा येथील अनिकेत भोसले याने इंदापूर पोलिसांकडे दिली होती त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार अनिकेत याचे लग्न काटी येथील मुलीशी ठरले होते, परंतु अनिकेतला पाच लाख रुपये हुंडा देणे शक्य नसल्यावरून लग्न फिसकटले. मात्र संबंधित मुलीशी लग्न करण्यावर अनिकेत ठाम होता आणि सासरकडच्यांनी परस्पर तिचे लग्न दुसरीकडे जमवण्याचा घाट घातल्याने लग्नाच्या काही दिवस आधी अनिकेत आणि संबंधित मुलगी पळून जाऊन त्यांनी लग्न केले.
मात्र सासरकडच्या सर्वांनी त्यांना पकडून जबरदस्तीने काटी येथे आणले व त्याच्यावर आघोरी प्रथा व जादूटोणा करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्याला मानवी विष्ठा खाण्यास तसेच मलमूत्र पिण्यास भाग पाडले. तसेच या घटनेचा व्हिडिओ तयार करून तो फेसबुक वर एका महिलेने अपलोड केला त्यावरून माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान 11 जणांपैकी तिघा जणांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.