दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई ते पाचगणी मार्गावर पसरणी घाटातील बुवासाहेब मंदिराच्या पुढील वळणावर महाडहून केमिकल घेऊन विशाखापट्टणमकडे निघालेला टॅकर हा चालकाचे नियंत्रण सुटल्याने तब्बल दोनशे फूट खोल दरीत कोसळला.
टँकर चालक राम अकबल राधेश्याम यादव याचा ताबा
सुटल्याने रस्त्याकडेला असणारे संरक्षण कठडे तोडून तो अंदाजे २०० फुट दरीत कोसळल्याने चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी वाई पोलिसांनी रुग्णवाहिकेतून सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
या अपघाताची माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना समजताच त्यांनी हवालदार श्रीनिवास बिराजदार, सुमीत मोहिते, रुपाली भोसले, रुपेश जाधव यांना सोबत घेऊन घटना स्थळावर दाखल झाले.
रविवार पेठ येथील आदित्य गुरव अंकुर सावंत व इतर नागरिकांच्या सहकार्याने गंभीर जखमी चालकाला २०० फुट खोलीवरुन झोल्याच्या साह्याने आणून त्यास उपचारासाठी पाठवले. या अपघाताची नोंद वाई पोलिस ठाण्यात दाखल झाली असून अधीक तपास हवालदार श्रीनिवास बिराजदार हे करीत आहेत .