विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावरती होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते.
त्यावेळी बोलताना अजित पवार आणि बारामती एक भावनिक नातं तयार झालं आहे.एक वेगळ समीकरण त्याच्यामध्ये तयार झाल आहे. ज्याची तुम्हाला तर कल्पना आहे. पण संपूर्ण महाराष्ट्रालाही त्याची कल्पना आहे. त्यामुळे बारामतीकरांचे प्रेम कायम माझ्या पाठीशी असेल अशी मला खात्री वाटते.
बारामतीकरांचा प्रतिनिधी म्हणून माझ्याकडे बघितले जाते, ज्यावेळेस १ लाख ६५ हजार मताधिक्याने तुम्ही मला तिथे पाठवता, त्यावेळेस मी ताठ मानेने सभागृहात जात असतो. त्यावेळेस सगळेजण बघत असतात. हे बघा १ लाख ६५ हजार मताधिक्याने निवडून आलेत.
काहीजण येतात सहाशे, सातशे, हजार मतांनी निवडून येतात. कधी कधी सहा मतांनी देखील आमदार निवडून आलेत. ही वस्तुस्थिती आहे. पण तुम्ही मतांचा बोजा टाकल्यावर मलाही सुचत नाही. मलाही वेळ न पाहता मी पहाटे उठून काम करतोय. एक परिवार म्हणून आपण सगळेजण करतोय.
तसेच तुम्ही मला, शरद पवार, सुप्रिया सुळे यांना वेगवेगळे पदे मिळवून दिली. अनेक ठिकाणी आपल्यामुळे आम्हा सगळ्यांना विविध पदांची संधी मिळाली. तसेच आम्ही ज्या पदापर्यंत पोहोचलो हे केवळ आमच्यामुळे पोहोचलो नाही तर ही संधी बारामतीकरांमुळे मिळत असते. हे आम्ही कधीही विसरू शकत नाही.असेही अजित पवार म्हणाले.