शिरूर : महान्युज लाइव्ह
शिरूर तालुक्यात धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली असून सावत्र भावाने वहिनीचा खून केला आहे. तर स्वतः पळून जात असताना त्याचा ही अपघात होऊन गंभीर जखमी झाला आहे.
भावावर हल्ला केल्याने भाऊ देखील हल्ल्यात गंभीर जखमी आहे. प्रियांका सुनील बेंद्रे (वय.२८) असे मयत वहिनीचे नाव आहे. तर भाऊ सुनील बाळासाहेब बेंद्रे हे गंभीर जखमी आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी अनिल बाळासाहेब बेंद्रे याने भावाने नोकरी घालविल्याचा संशय आल्याने तो राग मनात अनिल याने घरी झोपलेल्या भाऊ सुनील यास व वहिनी प्रियंका यांना व्यायाम करण्याच्या लोखंडी डंबेल्स ने तसेच चाकू ने मारहाण केली. यात प्रियांका हिला जबर मारहाण झाल्याने प्रियांका चा मृत्यू झाला. तर भाऊ सुनील हा गंभीर जखमी झाला.दरम्यान आरोपी अनिल हा पळून जात असताना कारला धडकून गंभीर जखमी झाला.
याप्रकरणी बाळासाहेब पोपट बेंद्रे यांनी शिरूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली असून पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. शिरूर तालुक्यात घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिस पुढील तपास करत आहे.
सुनील याच्या सांगण्यावरून अनिलला वडिलांनी गावाकडून आणले आणि सुनिलमुळेच अनिल ची नोकरी गेली असा संशय अनिलला होता. या संशयातून त्याने हे कृत्य केले असल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे.