बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा समिती अंतर्गत पोलीस प्रशिक्षण केंद्रातून पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे.
ही माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भरत शिंदे यांनी दिली. नुकताच महाविद्यालयास पुणे विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार व करिअर कट्टाचाही राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. एवढेच नव्हे तर मागील ४-५ वर्षात विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयातून १००हून अधिक विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत यशस्वी झाले आहेत.
मागील वर्षी मार्चमधे १८ विद्यार्थी फौजदार झाले होते.
महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्रातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील असंख्य विद्यार्थी तहसीलदार, लेखाधिकारी, विक्रीकर निरिक्षक, ऑडिटर, पोलीस काॅन्स्टेबल, फौजदार अशा पदावर विराजमान झालेले आहेत ही आनंदाची गोष्ट आहे असं सांगून स्पर्धा परीक्षा समितीचे समन्वयक डॉ. सुनिल ओगले व स्पर्धा परीक्षा समितीतील सर्व सदस्यांनी यासाठी खुप मेहनत घेतली त्यांचे प्राचार्य डॉ शिंदे यांनी अभिनंदन केले.
विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सौ. सुनेत्रा पवार यांच्या सुचनेनुसार प्राचार्य डॉ भरत शिंदे यांनी सुरू केलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातून असंख्य होतकरू विद्यार्थ्यांनी भरती परीक्षेत हे यश मिळविले. उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, सौ. सुनेत्रा पवार, खजिनदार युगेन्द्र पवार, सचिव ॲड. नीलिमा गुजर, डॉ. राजीव शहा, श्री किरण गुजर, श्री मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. श्यामराव घाडगे व डॉ. लालासाहेब काशीद, निलीमा पेंढारकर, विशाल भोसले व विशाल चव्हाण आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई/ काॅन्स्टेबलपदी निवड झालेले विद्यार्थी..!
पालघर जिल्हा ३ – सुरज कारंडे, वैभव लोंढे, रावसाहेब राऊत. ठाणे २ – अक्षय गावडे, बाबीर कोडलकर. सिंधुदुर्ग १ – प्रदिप सलामपुरे. रत्नागिरी १ – समीर गावडे. मिरा भाईंदर ९ – सुनिल खाडे, सोमा गाडेकर, सचिन शेळके, प्रविण वांडेकर, श्रीराम वीर, सचिन महानवर, गौरी कोळेकर, सागर जावीर, निखिल पांढरे
सातारा २ – विशाल गायकवाड, राजेंद्र किर्दक. पुणे ग्रामीण ७ – उमेश शिंदे, सौरभ गायकवाड, काजल सरोदे, मयुरी पवार, आशुतोष पानसरे, माऊली काळे, अवधूत शिंदे. पुणे शहर ४ – धनाजी खराडे, योगेश कायगुडे, अरूण गायकवाड, आबासाहेब पवार
पिंपरी चिंचवड ३– वैभव सोन्ने, दिपक पांचाळ, सुरज मेहेत्रे. पुणे रेल्वे १ – सुरज पठाण. मुंबई रेल्वे ३ – प्रियांका बनसोडे, विनायक धनवे, अंकुश मावलकर. सोलापूर ६ – प्रतिक्षा शिंदे, ज्ञानेश्वर गवळी, सुनिल बर्डे, गितेश आटोळे, अनिकेत खत्री, आकाश मोरे