बारामती : महान्यूज लाईव्ह
विरोधी पक्षनेते अजित पवार उद्या म्हणजे सोमवारी 23 एप्रिल रोजी बारामती दौऱ्यावर आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून ते बारामतीतील विविध विकासकामांची पाहणी करणार असून, दिवसभरात त्यांचा भरगच्च दौरा आहे. शहरात विविध ठिकाणी भूमिपूजन व उद्घाटनांचे कार्यक्रम त्यांच्या हस्ते होणार आहेत.
सोमवारी सकाळी सहा वाजता ते बारामती व परिसरातील विविध विकास कामांची पाहणी करणार असून या पाहणीनंतर ते जळोची येथील जमदाडे इस्टेट समोरील स्वप्नशिल्प पार्क या डी.एस. कन्स्ट्रक्शनच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहेत.
सकाळी पावणेदहा वाजता तांदूळवाडी येथील आर्या पॅराडाईज येथे हॉटेल स्वराज या हॉटेलचे उद्घाटन ते करणार असून, साडेदहा वाजता विद्या प्रतिष्ठान येथील माहिती तंत्रज्ञान सभागृहाच्या ठिकाणी त्यांचे आगमन होणार आहे. या ठिकाणी त्यांचा नेहमीप्रमाणे जनता दरबार होईल. त्यांनी कार्यकर्त्यांसाठी राखीव वेळ दिला आहे. नेहमीप्रमाणे या ठिकाणी ते लोकांना भेटतील.
दुपारी एक वाजता एमआयडीसीतील रुई पाटी येथे शिवशंभू द परफेक्ट मेन्स वेअर या दुकानाचे ते उद्घाटन करणार असून, दुपारी दीड वाजता डायनामिक्स डेअरी कंपनी शेजारील हॉटेल राजवाडा पार्क या हॉटेलचे उद्घाटन करणार आहेत.
यानंतर दुपारी तीन वाजता व्हॅनह्यूसन व लुई फिलीप या ब्रॅण्डेड कपड्याच्या दुकानाचे उद्घाटन श्री पवार करणार असून पावणेचार वाजता सम्यक लाईफस्टाईल शेजारील स्पंदन अपार्टमेंटमध्ये फिटनेस अँड प्रोटीन या दुकानाचे ते उद्घाटन करणार आहेत.