शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर शहरातून चोरी केलेल्या चारचाकी वाहनांचा पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने करत चार वाहने चेन्नई शहरातून जप्त केली आहेत.
याबाबत सविस्तर असे की,शिरूर शहरातील गेल्या काही दिवसांत अनेक दुचाकी बरोबर चारचाकी वाहने चोरीला जात होती. ही चोरीला जाणारी वाहने रात्रीच्या वेळी पार्क करून लॉक केलेली असतानाही चोरी गेली होती त्यामुळे मोठे भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. याबाबत गुन्हे दाखल झाल्यानंतर चोरीची चारचाकी वाहने शोधणे हे पोलिसांसमोर आव्हान होते.
याबाबत पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू करत वेगवेगळी पथके तपासासाठी रवाना करण्यात आली. तपासात चोरीची वाहने ही नगर मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे गेली असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अधिक तपास करत गेलेली वाहने ही तामिळनाडू राज्यातील चेन्नई येथे असल्याची माहिती मिळाली. यावेळी तपास पथकाने चेन्नई येथे जाऊन राजा कल्याण सुंदरम, रविंद्रम गोपीनाथ, यादवराज शक्तिवेत यांना ताब्यात घेऊन एक चोरीची डिझायर कर ताब्यात घेतली.
त्यांच्याकडे मिळून आलेली कार ही आर सुधाकरन याने दिली असल्याची तपासात माहिती मिळाली. पोलिस चेन्नई मध्ये असल्याची चाहूल लागल्यानंतर आर. सुधाकरन हा पळून गेला, मात्र पोलिसांनी कसून तपास करत आर. सुधाकरन यास शाहगड जालना येथून ताब्यात घेतले.यावेळी पोलिसांनी त्याच्याकडे अधिक माहिती घेतली असता, त्याने मागील चार महिन्यात दहा गाड्या खरेदी केल्याचे सांगितले. मग पोलिसांनी चार वाहने जप्त केली.
या मध्ये दोन स्विफ्ट, दोन डिझायर कार अशा वाहनांचा समावेश आहे. पोलिसांनी शिरूर पोलिस स्टेशनचे चोरीचे तीन व कोतवाली पोलिस स्टेशनचे एक असे गुन्हे उघडकीस आणले. आरोपींनी चोरी करताना एकत्रित येऊन सॉफ्टवेअर वापरून कार अनलॉक करुन वाहने चोरी केली केली असल्याचे पोलिसांना सांगितले.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहायक फौजदार तुषार पंदारे, पोलिस हवालदार सचिन घाडगे, राजू मोमीन, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, दीपक साबळे, संदीप वारे, अमोल शेडगे, मंगेश भगत, अक्षय नवले, अक्षय सुपे, दगडू वीरकर यांच्या पथकाने केली आहे.