सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : निमगाव केतकी येथील मुस्लिम दफनभूमी शेड उभारणे व ईदगाहच्या सुशोभीकरणासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन विकास मंडळातून 15 लाखाचा निधी दिला जाईल, अशी घोषणा इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे अध्यक्ष राजवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि.20) केली.
निमगाव केतकी येथे जनहित ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित रोजा इफ्तार पार्टीस राजवर्धन पाटील यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.
राजवर्धन पाटील म्हणाले की, रमजान महिना मुस्लिम समाजामध्ये अतिशय पवित्र असून इफ्तार पार्टीच्या माध्यमातून सर्वधर्मियांमधील सामाजिक एकोपा मजबूत करण्याचे काम होत आहे.
यावेळी देवराज जाधव, किशोर पवार, मच्छिंद्र चांदणे, गोरख आदलिंग, सचिन चांदणे, सिकंदर मुलाणी, मुस्लिम ट्रस्टचे अध्यक्ष सचिन मुलाणी, उपाध्यक्ष जावेद मुलाणी, तुषार खराडे, मौलाना वारिस जमाली, जनहीत पतसंस्थेचे अध्यक्ष अस्लम मुलाणी, उपाध्यक्ष पंकज महाजन, सचिव असिफ शेख व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.