सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील लोमेवाडी गावच्या प्राथमिक शिक्षिका डॉ. उषा भोईटे-पवार यांना यशराज रिसर्च फौंडेशन ने ‘द ग्रास रुट चेंज मेकर्स ऑफ इंडिया ‘ पुरस्कार देऊन सन्मानित केले.डॉ.उषा भोईटे-पवार यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे लुमेवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कार्यकुशलतेच्या जोरावर मिळवलेल्या यशामुळे भोईटे – पवार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. डाॅ.उषा भोईटे -पवार यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग,माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे डाॅ.उषा भोईटे -पवार यांना सन्मानित करण्यात आले.
यशराज रिसर्च फौंडेशन यांनी दत्तक घेतलेल्या आदिवासी शाळांसाठी अभ्यासक्रम तयार करून दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते डाॅ.अभय बंग,माजी केंद्रीय वित्त सचिव डॉ.अजयभूषण पांडेय व प्रा.नावकांत भट शास्त्रज्ञ यांच्यासह डॉ. उषा भोईटे पवार यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी यशराज रिसर्च फौंडेशनच्या अध्यक्षा दिपाली भानुशाली, पद्मभूषण पद्मश्री डॉ.गोविंदराजन पद्मानभन उपस्थित होते. डॉ.उषा भोईटे पवार या पीएचडी केलेल्या इंदापूर तालुक्यातील पहिल्या प्राथमिक शिक्षिका आहेत. तसेच या पुरस्काराने भविष्यात सामाजिक काम करण्याची उर्जा मिळेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. यशराज रिसर्च फौंडेशन कडून त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल एक रूपया देखील मानधन त्यांनी घेतले नाही.