दौंड : महान्यूज लाईव्ह
तीनही मुली झाल्या म्हणून सासरच्या नवरा सासू सासरे यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या शारीरिक मानसिक त्रासाला कंटाळून दौंड तालुक्यातील खोर येथील अश्विनी योगेश चौधरी या 30 वर्षीय विवाहितेने घराशेजारच्या विहिरीच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केली.
याप्रकरणी अश्विनी यांचा भाऊ संदेश जयसिंग काळकुटे (रा. वाडेबोल्हाई ता. हवेली) यांनी यवत पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी पती योगेश ज्ञानदेव चौधरी, मंदा ज्ञानदेव चौधरी व सासरा ज्ञानदेव सोनबा चौधरी (सर्व रा. पाटीलवस्ती खोर, ता. दौंड, जिल्हा पुणे) या तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अश्विनी हिचा विवाह झाल्यापासून सन 2006 ते 20 एप्रिल रोजीपर्यंत अश्विनी हिचा सासरच्यांनी वेळोवेळी मारहाण शिवीगाळ व शारीरिक आणि मानसिक छळ केला. अश्विनी हिला तीनही मुली झाल्या, यावरून सासरची लोक सातत्याने तिला टोमणे मारत होते. त्याचबरोबर घेतलेले दागिने हरवले अशा वेगवेगळ्या कारणावरून शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण करत होते. त्याला कंटाळून अश्विनी हिने 20 एप्रिल रोजी सकाळी सहा वाजण्याच्या पूर्वी घराजवळच्या विहिरीच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केली.