दौलतराव पिसाळ: महान्यूज लाईव्ह
वाई : तालुक्यातील नागरिकांकरिता शासकीय योजनांची जत्रा अभियानांतर्गत वाई तहसिल कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडून खराब/जीर्ण शिधापत्रिका बदलून देणे, शिधापत्रिकेतील नांवे कमी करणे तसेच शिधापत्रिकेमध्ये नांवे समाविष्ट करणेसाठी दिनांक 21 एप्रिल रोजी सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत तहसिल कार्यालय वाई, नविन प्रशासकीय इमारत (मिटींग हॉल) येथे शिबिराचे आयोजन केले आहे.
नागरीकांनी आपल्या परिपूर्ण पुराव्यांसह प्रकरणे घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव व तहसिलदार वैशाली जायगुडे-घोरपडे यांनी केले आहे. खराब, जीर्ण शिधापत्रिका बदलून मिळणेसाठी अर्ज, उत्पन्नाचा दाखला, रेशन दुकानदार, दाखला, मूळ रेशनकार्ड, (रेशनकार्ड हरविले असल्यास साध्या कागदावरिल प्रतिज्ञापत्र) तसेच सर्व कार्डातील सर्व सदस्यांची आधारकार्ड झेरॉक्स ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
तसेच रेशन कार्डातील नाव कमी करण्यासाठी अर्ज, शिधापत्रिका, मृत्यु दाखला किंवा लग्नपत्रिका (मुलीचे लग्न झाले असल्यास), तसेच रेशन कार्ड नांव समाविष्ट करणेसाठी अर्ज, शिधापत्रिका, जन्म दाखला / बोनाफाईड, लग्न होऊन आली असल्यास नांव कमी केलेचा दाखला ही कागदपत्र आवश्यक आहेत.
नावातील दुरुस्ती करणेसाठी अर्ज, शिधापत्रिका व गॅझेटची झेरॉक्स ही कागदपत्र आवश्यक आहेत. तरी वाई तालुक्यातील नागरीकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.