शिरूर : महान्यूज लाईव्ह
सध्या सर्वत्र यात्रांचा हंगाम सुरू आहे. अनेक भागात गावोगावी यात्रांचे वेगळे वैशिष्ट्य असते.शिरूर तालुक्यातील सादलगाव ही यात्रा विशेष प्रसिद्ध आहे ती पेढ्यांसाठी…!
सादलगाव (ता.शिरूर) येथील ग्रामदैवत श्री बापूजीबुवा यात्रा महोत्सवास आजपासून सुरू झाला. सादलगाव येथील भीमानदी पात्रात बापूजीबुवा देवाचे पुरातन मंदिर आहे. यात्रेच्या दिवशी हजारो नागरिक उपस्थित राहून हजारो टन पेढे हे देवाला वाटले जातात. त्यामुळे ही यात्रा विशेष प्रसिद्ध आहे.
आज सकाळी पहाटे देवाचा अभिषेक व होम झाल्यानंतर पालखी मिरवणूक भिमा नदीपात्रात पोहोचली. यावेळी एकाचवेळी देवाला नारळ फोडल्यानंतर भाविकांनी पेढे वाटप केले. यावेळी सुमारे साडे तीन टनांहून अधिक पेढे वाटप करण्यात आले.