दौंड, महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील नानगाव येथे यात्रेदिवशीच चोरट्यांनी घरफोडी करून चोरी केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता कानगाव येथे यात्रेच्या पहिल्या दिवशी चोरट्यांनी दोन घरफोड्या करून तब्बल ८ लाख ३९ हजार ७७८ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
दौंड तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या यात्रेचा हंगाम सुरू आहे. अशातच चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मागील काही दिवसांपूर्वी नानगाव येथील ग्रामदैवत रासाई माता यांच्या यात्रे उत्सवाच्या पहिल्या दिवशी घरपोडी करून अज्ञात चोरट्यांनी मोठा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली होती.
ही घटना ताजी असतानाच आता पाटस पोलीस चौकीच्या हद्दीतील कानगाव येथील राजेंद्र दशरथ गवळी त्यांच्या राहत्या घरातील बंद घराचे दरवाज्याचे कुलूप तोडून आणण्यात घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील तीन लाख रुपये रोख रकमेसह मूल्यवान सोने-चांदीचे दागिने असा एकूण ७ लाख ४० हजार ६९३ रुपयांचा ऐवज आज्ञात चोरट्यांनी चोरी केली.
त्याच रात्री विनोद दत्तात्रय फडके यांच्या घरात प्रवेश करु त्यांची आई अनिता झोपेत असताना त्यांच्या गळ्यातील ९९ हजार ८५ रूपये किंमतीचे मंगळसूत्र व मिनी गंठण गळ्यातुन हिसकावून दोन अज्ञात चोरटे पसार झाले. ही घटना सोमवारी (दि.१७ ) ते दि. १८ रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली.
कानगाव ची यात्रा सोमवारी (दिनांक १७ ते मंगळवारी दिनांक १८ रोजी ) या दोन दिवशी होती. मात्र यात्रेच्या पहिल्याच दिवशी चोरट्यांनी घरफोडी करून परिसरात दहशत निर्माण केली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळतात यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक फौजदार सागर चव्हाण व पोलीस कर्मचारी घटनास्थळी भेट देत परिसराची पाहणी केली. अज्ञात चोरट्यांचा शोध यवत पोलीस घेत आहे.