ताज्या बातम्या

मंगलदास बांदलानी केला धुराळा.. बांदलांनी खरोखरच पवारांची उडवली धांदल..! जिजामाता बॅंकेच्या निवडणूकीत विरोधकांचा केला पालापाचोळा..

शिरूर – महान्यूज लाईव्ह

मंगलदास बांदल राजकारणातून बाहेर म्हणजे तिथे मजाच नाही.. मात्र जिथे बांदल.. तिथे भल्याभल्यांची धांदल उडणार हे नक्की..! मध्यंतरीच्या तुरुंगवारीत बांदल शिरूरच्या राजकारणात दिसले नव्हते.. मात्र बांदलांनी येताच अशी एन्ट्री घेतली की, आमदार अशोक पवारांची खरोखरच धांदल उडवून दिली आहे.

जिजामाता बॅंकेच्या निवडणूकीत मंगलदास बांदल व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने १३ पैकी १३ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले.

जिजामाता बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर बांदल यांनी निवडणूक लढवणार म्हणून ते सर्व ताकदीनिशी निवडणूक उतरले होते. यावेळी त्यांच्यासमवेत बाजार समितीचे संचालक व आमदार अशोक पवार यांचे समर्थक आबाराजे मांढरे हे बांदल यांना साथ देत निवडणुकीत उतरले.

तर दुसरीकडे भाजपचे कट्टर असलेले व आमदार अशोक पवार यांचे विरोधक काकासाहेब खळदकर यांनी पवार यांच्या हातात हात देत निवडणुकीत पत्नीची उमेदवारी जाहीर केली. यामुळे सगळीकडे कार्यकर्ते संभ्रमात पडले होते. यामुळे राजकीय गणिते पक्षाच्या पलीकडे गेली. ही गणिते दररोज बदलत असताना जोरदार प्रचार दोन्ही बाजूने करण्यात आला.

बांदल हे नेहमी निवडणुकीत उभे असतात तेव्हा ते करिष्मा करत बदल घडवून आणतात. या निवडणुकीत बांदल कसा करिष्मा दाखवतात याकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. मांडवगण फराटा, शिक्रापूर अन् शिरूर परिसरात जास्त मतदान असल्याने निर्णायक बदल घडून येण्याची अपेक्षा होती.त्यानुसार बांदल यांनी एकहाती वर्चस्व निर्माण करत सर्व उमेदवारांना निवडून आणले. तालुक्यात सध्या बांदल यांच्या या निवडणुकीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

tdadmin

Recent Posts

इंदापूरमध्ये घड्याळाचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत? पैशावरून राडा!

इंदापूर : महान्यूज लाईव्ह  महायुतीचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत, म्हणून महिलांनी इंदापूरात…

12 hours ago

मोदीसाहेब, तुमचा टेलीप्रॉम्टर तपासा… खरंच सांगा शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला?

बारामती : महान्यूज लाईव्ह गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सभा वाढवल्या. या…

2 days ago