नानाची टांग
काल म्हणे एक गंमतच झाली.. गुन्हेगार दिसला, आणला त्याला पोलिसदादानं थेट ठेसनात..पण.. बाब्वो, सोडावा लागला त्याला मोकाट..! कसलं गणित, कसली बेरीज? कोणाच्याच डोक्यात जेव्हा हे नाही शिरत.. माझ्यासारखा फिरस्ता, रस्त्याने होता तेव्हा फिरत..
फिरस्त्याला दिसला हा गटतट थेट.. पण कायद्याच्या राज्यात म्हणे हे शहर आहे बेस्ट ..तरीसुदीक कोणी तरी देत होतं ठेंगा.. गुलाबराव.. सांगा.. ना.. काल शहरात कोणी गंमत केली सांगा..!
अवैध धंद्यातील गुन्हेगार कोणी पोलिस ठाण्यात आणला सांगा.. कोणी तिला सोडून दिली तेबी लगीच सांगा..कोणाच्या भांडणात कोणाचा झाला वांदा? ही गंमत कायद्याच्या राज्यात कोणी केली खरंच सांगा..
दोन पिल्ले अवळेजावळे.. जेव्हापासून इथे बसले.. दररोज शहरात घालतात दंगा.. .कालची गंमत कोणी केली? खरंच एवढी वेळ सांगा..!
आवळ्याजावळ्या दोन गबरूंनी उच्छाद मांडलाय भवताली.. गुटख्याची रेड सारी अंगलट बघा कशी आली.. घेतलेलं पैसे द्याया, मग तारांबळ हो किती झाली..आम्ही नाही त्यातलं म्हणत कडी कोणी लावली सांगा.. अय दादा, कालची गंमत कोणी केली खरंच सांगा..!
आता मात्र लईच झालं.. अवं आमच्या कामात गबरू लक्षबी घालतेत, अपमानबी करतेत बाकीचा कर्मचारी कावला.. मग थेट वरच्या सायबाला मेसेज की वो धाडला.. का..ल.. ई मेल की हो गेला.. अय, कालची गंमत कोणी केली खरंच आता तरी सांगा..!
आपला एरिया.. आपलाच गुन्हेगार.. त्याला फक्त आपूणच धरणार.. ! धरणार.. नेणार..आणणार.. सोडणार.. फिरविणार.. जिरविणार.. आपलाच सारा झिंगा.. अय्योव… कालची गंमत कोणी केली खरंच आता तरी सांगा..!
परवा चौकात असाच रेशनवाला दिसला.. ओळखीचाच पण कापावासा वाटला.. घरातनं आणला टेम्पो.. अन लांबनं आणला म्हणून दावला.. गबरू लयीच झ्याक, भाव उगाच नाय वाढला.. साराच जांगुडगुत्ता आणि रिंगाझिंगा.. कालची गंमत कोणी केली खऱंच आता तरी सांगा..!
आठवतं ना?.. २७ जणं म्हणे एका तायडीच्या प्रकरणात सापडले..गाडीत डालून आणले, तेव्हा लाखा लाखाला गाडले.. त्याचा इतिहास अजूनही आहेच की हो जागा.. मग कालची गंमत कोणी केली खरंच आता तरी सांगा..!
दिवस तर सगळ्यांचेच भरतात… मी, तू.. तो.. ती सारे सारे आहेत, त्याच कर्माचा साचा… एवढ्या भलत्या, सलत्या तक्रारी, तरी अवळ्याजावळ्याला धाक नाही कोणाचा…? काय आहे इंगित याचं आता तरी सांगा.. खरंच कालची गंमत त्यांचीच होती ना? आता तरी सांगा..!
खरंच आवरा आता त्यानला भाव.. नायतर बळी जायचं वरच्याचं नाव.. पैशाची हाव नाही चांगली, आता तरी थांबा राव.. लोकांनाही कळतो चोर कोण आणि कोण साव.! एवढं लिहीलं.. थोडं तरी कळावं.. लेकी बोले सुने लागे असं तरी घडावं.. मी खरं बोलतो ना? एकदा तरी सांगा.. कालची गंमत तुम्हीच केली! फक्त हो की नाही, सांगा..!