बारामती : महान्यूज लाईव्ह
दहावीनंतर शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध असतात, परंतू विद्यार्थ्यांना त्याची माहिती नसते. ही माहिती मिळून त्यांना पुढील शिक्षण तसेच करियरबाबत मार्गदर्शन व्हावे यासाठी बारामतीच्या आचार्य अॅकॅडमीमार्फत उद्या दि. ( १६ ) रोजी इंदापूर व भिगवण येथे ‘गुरुमंत्र यशाचा ‘ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
भविष्यकालीन वाटचालीत अकरावी आणि बारावी या दोन वर्षांचे महत्व, जेईई, नीट, एमएचटी – सीईटी, एनडीए या स्पर्धापरिक्षांचे महत्व, आयआयटी – नीट परिक्षांची कार्यप्रणाली या विषयांबाबत या कार्यक्रमामध्ये माहिती दिली जाणार आहे. इंदापूर येथील गुरुकृपा सांस्कृतिक भवन येथे सकाळी १० वाजता तर भिगवण येथील तारादेवी लॉन्स येथे सायंकाळी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
आचार्य अॅकॅडमीचे संस्थापक प्रा. ज्ञानेश्वर मुटकूळे, संचालक प्रा. प्रविण ढवळे आणि शैक्षणिक समन्वयक प्रा. बापू काटकर हे यावेळी मार्गदर्शन करणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रवेश मोफत असून विद्यार्थी व पालकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांमार्फत करण्यात आलेली आहे.