दौंड – महान्यूज लाईव्ह
बारामतीतील कत्तलखान्यात गोवंशाची कत्तल करून त्यांचे गोमांस पुण्यात विक्रीसाठी घेऊन निघालेल्या तिघा व्यापाऱ्यांना यवत पोलिसांनी कासुर्डीच्या टोलनाक्यावरच ताब्यात घेतले. ते गोमांस पुण्यातील ज्या अफूभाईला विकायला चालवले होते, पोलिसांनी या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला.
यासंदर्भात यवत पोलिसांनी तोशिब अकबर आत्तार ( वय 23 वर्षे, रा. कसबा बारामती, ता. बारामती, जि. पुणे) , मुजफ्फर रंगरेज भाई (पुर्ण नाव माहीत नाही) आणि अन्वर कुरेशी ( पूर्ण नाव माहीत नाही, दोन्ही रा. म्हाडा कॉलनी, शिवाजी चौक, बारामती) आणि पुण्यातील कोंढवा येथील अफुभाई (पुर्ण नाव माहीत नाही) या चौघांवर गुन्हे दाखल केले आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम -५ (क) ९ (अ) ९ (ब), भा.द.वि.का. ३४, शस्त्र अधिनियम १९५९ चे ४, २५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक दत्तात्रेय काळे यांनी फिर्याद दिली.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आज (ता.१४) सकाळी पावणेसहाच्या सुमारास कासुर्डी गावच्या हद्तीत टोलनाक्यावर वरीलपैकी मुजफ्फर व अन्वर हे बारामतीतील कत्तलखान्यातील मांस हे ह्युंदाई कंपनीच्या सेंट्रो गाडीमध्ये (नंबर एम.एच.12.डी.एस.8769) भरून पशुसंवर्धन विभागाचा कोणताही परवाना नसताना वाहतुक करीत होते.
तर दुसरीकडे गाडीच्या सीटखाली तोशिब अत्तार याने धारदार लोखंडी कोयता ठेवला होता. या गाडीतील गोमांस अफुभाई (पुर्ण नाव माहीत नाही) याला विक्रीसाठी घेऊन चालले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना पकडले.