बारामती – महान्यूज लाईव्ह
उपजिल्हाधिकाऱ्यांपाठोपाठ राज्यातील तहसीलदारांच्याही बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. काल ता. १२ रोजी राज्याच्या महसूल विभागाने जारी केलेल्या बदली परिपत्रकात बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी गणेश हरिदास शिंदे हे सध्याचे शिराळा तालुक्याचे तहसीलदार बारामतीचे नवे तहसीलदार असतील .
दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांचीही बदली करण्यात आली असून ते आता उजनी प्रकल्पावर तहसीलदार तथा सहायक पुनव्रसन अधिकारी म्हणून काम पाहतील. वाईचे सध्याचे तहसीलदार रणजित भोसले यांची मुळशीचे तहसीलदार म्हणून तर वेल्ह्याचे तहसीलदार म्हणून दिनेश पारगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवडच्या अपर तहसीलदार गीता गायकवाड यांची सोलापूरच्या विशेष कार्य दंडाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली असून पुणे नागरी समूहाच्या तहसीलदार डॉ. अर्चना निकम यांची पिंपरी चिंचवडच्या अप्पर तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पुण्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या तहसीलदार सुनिता आसवले-मुंडे यांची पुण्याच्याच नागरी समूहाच्या तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली असून विभागीय आयुक्तालयातील तहसीलदार मनिषा कुलकर्णी- देशपांडे यांची विभागीय आयुक्तालयातील सर्वसाधारण तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे, येथील तहसीलदार मिनल भामरे-भोसले यांची बदली करण्यात आली आहे.
चंदगडचे तहसीलदार विनोद रणवरे यांची सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे तहसीलदार म्हणून तर माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांची चंदगडचे तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूरचे दक्षिण विभागाचे तहसीलदार अमोल कुंभार यांची सोलापूरच्या जिल्हाधिकरी कार्यालयातील पुनर्वसन विभागाचे तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मंगळवेढ्याचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांची करवीर च्या तहसीलदारपदी तर करमाळ्याचे तहसीलदार समीर माने यांची आजरा तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आजऱ्याचे तहसीलदार विलास अहिर यांची माणच्या तहसीलदारपदी तर कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांची कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.