बारामती – महान्यूज लाईव्ह
राज्यभर कार्यक्रमातील हमखास गोंधळावरून चर्चेत असलेली लावणी कलाकार गौतमी पाटील १३ एप्रिल रोजी बारामती शहरातील तांदूळवाडीत येणार आहे.
तांदूळवाडीतील भैरवनाथ ग्रामदैवताच्या वार्षिक यात्रेसाठी ती तांदूळवाडीत येणार आहे. स्वतः गौतमी पाटील हिनेच ही माहिती दिली असून बेलदार यांच्या आमंत्रणावरून ती येथे येणार आहे.
चार दिवसांपूर्वीच गौतमी पाटील हिचा शिरूर तालुक्यातील अण्णापूर येथे कार्यक्रम होता. मात्र पोलिसांनी या कार्यक्रमास मनाई केल्याने गौतमी पाटील आली, मात्र तिला न नाचताच परतावे लागले होते. त्यानंतर पुन्हा नुकताच एक कार्यक्रम झाला, त्याही कार्यक्रमात गोंधळ झाला होता.
दुसरीकडे मध्यंतरीच्या काळात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अश्लिल हावभाव असलेले कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नयेत अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर गौतमी पाटील पुन्हा चर्चेत आली होती. अजितदादांची माफी मागून गौतमी पाटील हिने वेळोवेळी आपण चुका सुधारत असल्याचे सांगितले होते. आता तीच गौतमी थेट बारामती शहरात येत असल्याने तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.