रामभाऊ जगताप : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाच्या पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे गुढीपाडवा सणाला शिधा देणे शक्य न झालेल्या ठिकाणी आनंदाचा शिधा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तसाधून रेशन दुकानातून वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याला अनुसरून कांबळेश्वर येथे आनंदाचा शिधावाटप करण्यात येत आहे . यामध्ये 1 किलो साखर, 1किलो रवा, 1 किलो डाळ व 1 किलो तेल या वस्तू शंभर रुपयांमध्ये प्रत्येक शिधाकार्ड धारकाला मिळत आहेत.
कांबळेश्वर मध्ये 551 कुटुंबांना याचा लाभ होणार आहे.या वाटपाची सुरवात कांबळेश्वरच्या सरपंच मंदाकिनी कानडे, पोलीस पाटील रणजित रावते, रणजित खलाटे, संभाजी खलाटे, वाल्मिक वाघमारे, तलाठी टी. एस. तलवार, मंगल खलाटे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी सणानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ शिधापत्रिकाधारकांना वेळेत वितरित केल्याबद्दल कांबळेश्वर ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. या योजनेचा सर्व नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन सरपंच कानडे यांनी केले आहे.