सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : होमिओपॅथी ही तर्कशुद्ध शास्त्रीय उपचार पद्धत आहे. मात्र होमिओपॅथीक औषधाने बरे झालेल्या रुग्णांचे संशोधनात्मक, तंत्रशुद्ध मूल्यांकन सर्वांसमोर येणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन इंदापूर आयएमए चे माजी तालुकाध्यक्ष व हदयरोग तज्ञ डॉ. अविनाश पाणबुडे यांनी केले.
होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हनेमन यांच्या जयंती निमित्त दिनांक १० एप्रिल हा दिवस जागतिक होमिओपॅथिक दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात भारत सरकार आयुष मंत्रालय, इंदापूर तालुका होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटना तसेच आरोग्य संदेश प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी डॉ. हनेमन यांच्या प्रतिमेचे पूजन इंदापूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. एकनाथ चंदनशिवे, निमगाव चे वैद्यकिय अधीकारी मिलिंद खाडे, डॉ.महेश रूपनवर, डॉ.अनिल पुंडे- शिर्के, निमा संघटनेचे डॉ.अर्जुन नरुटे, डॉ. समीर मुलाणी, डॉ.लक्ष्मण सपकळ, होमिओपॅथिक संघटनेचे डॉ.अनंग मेहता, डॉ. आशिष दोभाडा, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ.नामदेव गार्डे, डॉ.सुहास शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ.पाणबुडे पुढे म्हणाले, होमिओपॅथीस काही लोक प्लेसिबो इफेक्ट मानतात. त्यामुळे होमिओपॅथिक डॉक्टरांनी विविध आजारावरील तंत्रशुद्ध निकाल सर्वां समोर पुराव्यासह आणणे गरजेचे आहे.आपण स्वतः होमिओपॅथिक औषधांमुळे मुतखडा मुक्त झालो आहे तर ही पद्धत विविध जुनाट आजारांसाठी प्रभावी आहे.या चिकित्सा पद्धतीचे अनेक डॉक्टर पूर्वी आधुनिक चिकित्सा शास्त्राचे एम डी पदवीधर होते. त्यांनी या चिकित्सा पद्धतीच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. माझा देखील या उपचार पध्दतीवरील विश्वास वाढला असून सर्व चिकित्सा पद्धतीच्या डॉक्टरांनी सर्वसमावेशक पद्धतीने वैद्यकिय सेवा द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान डॉ. हनेमन यांच्या प्रतिमेचे पूजन इंदापूर आयएमए चे अध्यक्ष डॉ.एकनाथ चंदनशिवे,डॉ.महेश रूपनवर, डॉ.अनिल पुंडे- शिर्के, निमा संघटनेचे डॉ. अर्जुन नरुटे, डॉ. समीर मुलाणी, डॉ. लक्ष्मण सपकळ, होमिओपॅथिक संघटनेचे डॉ.अनंग मेहता, डॉ.आशिष दोभाडा, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ.नामदेव गार्डे, डॉ.सुहास शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आरोग्य संदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष, जनरल सर्जन डॉ. श्रेणिक शहा म्हणाले, ऑपरेशन नंतर पोट फुगणे, आतड्यात आतडे अडकणे, स्पायनल हेडेक, १० एम ते ५१ एमएम पर्यंतचे मुतखडे, युरेथ्रल स्ट्रीक्चर आदी आजारात होमिओपॅथीची उपयुक्तता आम्ही पाहली आहे. सर्व डॉक्टरांनी रुग्णदेवोभव या तत्त्वाने आपआपल्या शास्त्राची ताकद व मर्यादा लक्षात घेवून वैद्यकिय सेवा करावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी डॉ.सतीश शिंगाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी होमिओपॅथिक संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. संदेश शहा, निमगाव केतकी ग्रामीण रुग्णालय आयुष होमिओपॅथिक वैद्यकिय अधिकारी डॉ. अरविंद अरकिले, डॉ.अमर फुले, डॉ.रणजित कोरटकर, डॉ.सचिन ननवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
स्वागत डॉ.सचिन बाबर, डॉ. रियाज पठाण, डॉ. निलेश कुंभार यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन इंदापूर उपजिल्हा रुग्णालय आयुष होमिओपॅथिक वैद्यकिय अधिकारी डॉ. सूर्यकांत बनसुडे यांनी केले. यावेळी डॉ. अतुल वणवे, डॉ. सचिन बिचकुले, डॉ.उदय कुरुडकर, डॉ. मधुकर राऊत, डॉ. अमित मारकड, डॉ. स्वप्नील शेलार, डॉ. अमीर मुलाणी, डॉ. हंसी चौधरी, डॉ. मानसी चंकेश्वरा, डॉ. निधी सोनवणे, डॉ.मनोज शिंदे उपस्थित होते.