शिरूर : महान्यूज लाईव्ह
इनामगाव (ता.शिरूर)येथील ऋतुजा तात्यासाहेब घाडगे हिने खडतर मेहनत घेत एम.बी.बी.एस परीक्षेत उज्ज्वल यश मिळवल्याने परिसरात अभिनंदन केले जात आहे.
ऋतुजा हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण श्रीगोंदा येथे झाले. निटची परीक्षा शाहू कॉलेज लातूर येथे पूर्ण केल्यानंतर वैद्यकीय शिक्षण पुणे येथील काशीबाई नवले मेडिकल कॉलेज येथे नुकतेच पूर्ण केले ऋतुजा हिने ५८० गुण मिळवत एम.बी.बी.एस ची पदवी संपादन केली.
याबाबत अधिक बोलताना ऋतुजाने सांगितले की, घरची परिस्थिती जेमतेम असताना ही खडतर मेहनत घेत अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. आई वडील हे मार्गदर्शक असून या यशात कुटुंबाचा मोठा वाटा असल्याचे ऋतुजा यांनी सांगितले.
वडील तात्यासाहेब घाटगे यांनी सांगितले की, ऋतुजा हिला लहानपणापासून डॉक्टर व्हायचे हे स्वप्न होते. त्या दृष्टीने कठोर परिश्रम केल्यानेच यश मिळाले आहे.इनामगाव व परिसरात ऋतुजा हीने प्रथमच मुलींमधून एमबीबीएस पदवी प्राप्त करत यश मिळवले आहे. या यशाबद्दल सरपंच पल्लवी घाटगे, श्रीगोंदा साखर कारखान्याचे माजी संचालक विजयसिंह मोकाशी, इनामगाव चे माजी उपसरपंच शिवाजी मचाले,तुकाराम मचाले, माजी पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र गदादे आदींनी ऋतुजाचा सत्कार केला.