बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, उपाध्यक्ष रोहित घनवट, तज्ञ संचालक प्रीतम पहाडे व श्रीनिवास बहुलकर यांनी दिलेल्या राजीनामावर चर्चा झाली. यामध्ये बँकेचे अध्यक्ष सचिन सातव आणि प्रीतम पहाडे यांचा राजीनामा संचालक मंडळाने एकमताने फेटाळला, मात्र उपाध्यक्ष रोहित घनवट आणि श्रीनिवास बहुलकर यांनी दिलेले राजीनामे मात्र स्वीकारण्यात आले.
बारामती सहकारी बँकेच्या चार पदाधिकाऱ्यांनी अचानक दिलेल्या राजीनामा यामुळे बारामतीत मोठी चर्चा झाली होती. बारामती सहकारी बँकेचे कामकाज चांगल्या प्रकारे चालवल्यानंतर मग राजीनामे घेण्याची गरज काय? असाही सूर होता. मात्र आज झालेल्या बैठकीत सचिन सातव यांचा राजीनामा फेटाळून संचालक मंडळाने त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले.
सचिन सातव यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात बारामती सहकारी बँकेचा एनपीए कमी करण्याचा प्रयत्न केला. बारामती सहकारी बँक यावर्षी आठ कोटी रुपये नफ्यात राहिली. या साऱ्या पार्श्वभूमीवर त्यांचे अचानक राजीनामे ही बारामतीतल्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना ठरली.