शिरूर : महान्यूज लाईव्ह
गौतमी पाटील अन् कार्यक्रमात गोंधळ असं समीकरण सगळीकडे पाहायला मिळत असताना शिरूरच्या एका कार्यक्रमात गौतमी येऊनही कार्यक्रम काही होऊ शकला नाही.
याबाबत सविस्तर असे की, शिरूर अन्नापुर येथे हनुमान जयंती निमित्त गौतमी पाटीलच्या डान्स शोचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पुणे ग्रामीण पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आयोजकांवर गौतमी पाटीलचा कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आली.
कार्यक्रम स्थळी गौतमी पाटील येऊनही तिने कार्यक्रम सादर केला नाही. या वेळी आयोजकांनी गौतमी पाटीलची सहकारी हिंदवी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. हनुमान जयंतीच्या कार्यक्रमात कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे बोलले जात आहे.