मानाच्या सासनकाठ्यांचे भव्य स्वागत.. छबीन्यासमोर शहरात आकर्षक रांगोळी.
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : सुमारे दीडशे वर्षांचा इतिहास असणारी इंदापूर शहरातील अकलूज रोडवरील जोतिबा देवाची यात्रा काल हनुमान जयंतीच्या दिवशी उत्साहात पार पडली. जोतिबाच्या नावानं चांगभलं..या जयघोषात इंदापूर शहर दुमदुमले.
इंदापूर अकलूज रोड वरील जोतिबा मंदिरात मुर्ती खडी असून चतर्भुज आहे. अनेकांचे हे कुलदैवत आहे. सकाळी सात वाजता छबिना संदिप जाधव व रोहीत जाधव यांच्या वाड्यातून मंदिराकडे आला.भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिरात सुहास शिंदे व देवराज देशमुख यांनी आकर्षक सजावट केली होती.
इंदापूर नगरपरिषदेचे नगरसेवक गटनेते कैलास कदम, भारत सुतार, बाळासाहेब सुतार, एकनाथ जाधव, बबन सुर्यवंशी, भारत साळुंके, अजिनाथ जगदाळे, शरद झोळ, पोपट जाधव भांगे, ननवरे यांच्या मानाच्या सासनकाठ्यांचे आगमन वाजतगाजत मंदिराच्या ठिकाणी आल्या.
खोबरे व गुलालाची उधळण करीत जोतिबाचे नावाने चांगभलं.. केदारनाथाच्या नावाने चांगभलंच्या जयघोषात मंदिराचा परिसर दुमदुमून गेला होता.
देवस्थान समिती व यात्रा कमिटीच्या वतीने याठिकाणी प्रसादाची, पिण्याच्या पाण्याची दिवसभर व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी चार वाजता देवस्थानचे अध्यक्ष अरविंद वाघ यांचे हस्ते आरती झाली. त्यानंतर छबिना मिरवणूक ग्रामप्रदक्षिणेसाठी निघाली.
यावर्षी छबिन्यासोबत केलेली आकर्षक विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. छबिन्यापुढे बबन सुर्यवंशी यांचा नगारखाना होता. केदार कोकाटे यांच्या हातात मानाचे ताट होते.जोतिबाचे सेवेकरी म्हणून रोहित जाधव,संदिप जाधव, अश्विन जाधव यांना मान होता. शहरात ठिकठिकाणी भक्तांनी सडा रांगोळी काढून छबिन्याचे स्वागत केले.
जोतिबा यात्रा व्यवस्थित पार पाडण्यासाठी देवस्थान समितीचे बाबासाहेब घाडगे,तानाजी पवार, कैलास कदम, गोरख शिंदे,गोरख सपकळ, बाळासाहेब उंबरे, दत्तात्रेय जासूद, गोरख कदम, एकनाथ जाधव, सुर्यकांत जाधव, शरद झोळ तर यात्रा कमिटीचे अध्यक्ष तानाजी देशमुख, अक्षय सुर्यवंशी, किर्तीकुमार भांगे, किशोर उंबरे, पोपट उंबरे यांनी विशेष परिश्रम घेतले.सामाजिक कार्यकर्ते महादेव चव्हाण, हमीद आत्तार यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी शिवाजी मखरे, हनुमंत कांबळे, संदिपान कडवळे, सुभाष दिवसे, अतुल शेटे, अशोक कदम, किशोर पवार उपस्थित होते.