सोलापूर : महान्यूज लाईव्ह
गेल्या काही दिवसातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडलेले सरकारी अधिकारी कर्मचारी जर पाहिले, तर आपल्याला सुद्धा त्यांची लाज वाटल्याशिवाय राहणार नाही. परंतु या हरामखोरांना कशाचीच लाज वाटत नाही हे आणखी एक या लोकशाहीचे दुर्दैव मानावे लागेल!
सोलापुरात अबकारी खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एका बिअर बारचे दरवर्षी रजिस्टरचे होणारे नूतनीकरण करण्याकरता, त्यावर फक्त शिक्केच मारण्यासाठी लाच मागितली. अर्थात ही लाचेची साखळी असावी, कारण ही 3000 रुपयांची लाच असली, तरी जिल्ह्यातील एकूण जेवढे बियर बार आहेत, तेवढ्या बियर बार कडून दरवर्षी त्यांना ती लाच मिळत असल्याखेरीज त्यांचा हा धडा झालेला नसणार!
परंतु यातील बियर बार च्या मालकाने धाडस करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यावर्षीचं हे नवं प्रकरण पोहोचवलं आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात एक्साईज खातं अडकलं.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रचलेल्या सापळ्यात अबकारी खात्याचा निरीक्षक संभाजी साहेबराव फडतरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सिद्धाराम आनंदेनप्पा बिराजदार व महिला कॉन्स्टेबल श्रीमती प्रियंका बबन कुटे या तिघाजणाविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणारा तक्रार तक्रारदार हा एका बियर बार आणि रेस्टॉरंट चा मालक असून दरवर्षी दारूच्या बाटल्यांचा स्टॉक रजिस्टर व ब्रँड रजिस्टर हे नूतनीकरण केले जाते त्यासाठी अबकारी खात्याचे शिक्के आवश्यक असतात. हे शिक्के मारण्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागण्यात आले. तडजोडीअंती ही लाच तीन हजार रुपयांवर ठरली. मात्र तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याची पडताळणी केली.
पडताळणीमध्ये महिला कॉन्स्टेबल श्रीमंती प्रियांका कुटे आणि सहाय्यक निरीक्षक बिराजदार या दोघांनी स्वतःसाठी व साहेब असलेल्या फडतरे याच्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान निरीक्षक फडतरे याने या लाच रकमेमध्ये तडजोड करून श्रीमती कुटे हिच्याकडे 3000 रुपयांची लाच देण्यास सांगितले. ही लाच स्वीकारताना श्रीमती कुटे हिला ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर तिघांनाही ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सोलापूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार श्री सोनवणे, श्री घाडगे, श्री मुल्ला, श्री किनगी, पवार, घुगे व चालक उडानशिव यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली केली.