कोल्हापूर – महान्यूज लाईव्ह
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात वाळकुडी- केरवडे येथील जलजीवन पाणी योजनेच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात शिवाजी पाटील या भाजप नेत्याने अवघ्या महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या राजकीय व इतिहासाच्या अभ्यासाचा पंचनामा केला. भाषणादरम्यान चक्क शाहू, निळू फुले व आंबेडकर यांना मानाचा मुजरा म्हणत त्यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियात गाजतोय..
त्याचा व्हिडिओ येथे पहा..
आमदारकीच्या निवडणूकीसाठी इच्छुक असलेल्या पाटील यांचे अगाध ज्ञान पाहून उपस्थितांनी तर कपाळाला हात लावलाच, मात्र सध्या त्यांचे हे भाषण अगदी चवीने सोशल मिडीयावर पाहिले जात आहे.
त्यांनी भाषणात अगोदर छत्रपती शिवरायांना मुजरा केला, त्यानंतर उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवल्या, मग त्यानंतर त्यांनी शाहू, निळू फुले व आंबेडकरांना मानाचा मुजरा केला. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
निळू फुले यांचे नाव घ्यायला हरकत नाही, मात्र ते महाराष्ट्रातील दिग्गज अभिनेते होते, तर महात्मा फुले हे देशाचे प्रागतिक महापुरूष आहेत, एवढेही नेत्यांना कळू नये म्हणजे जरा अतिच होतेय, दरम्यान यावर नेटकऱ्यंनी मात्र महात्मा फुले भाजपला टोचताहेत की, काय, कदाचित येणाऱ्या काळात महात्मा फुलेंचीही बदनामी करण्यास मागेपुढे पाहिले जाणार नाही असा टोला लगावला आहे.