दौंड – महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस, कानगाव , देऊळगाव राजे परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे, घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज चोरी झाल्याची घटना घडली आहे.
दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथील अतुल अप्पा सकुंडे यांच्या घराचा दरवाजा अज्ञात चोरट्यांनी तोडुन घरातील. सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशा एकूण अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कानगाव येथील प्रकाश नानासो गवळी यांच्या घरफोडी करून अज्ञात चोरांनी ५ तोळे सोने आणि ३० हजार रूपये असा एकूण ३ लाख ५० हजार रक्कमेचा ऐवज चोरी केल्याची घटना घडली आहे.
पाटस येथील भागवत वाडी, कौठचा मळा येथील भानुसे यांच्या घराचा भरदिवसा कुलूप तोडून अज्ञात चोरांनी सोने चांदीचे मौल्यवान दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची घटना ही घडली आहे. याप्रकरणी दौंड व यवत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.