सुपे पोलिसामार्फत 48 तासात तिसरा आरोपी जेरबंद
सचिन पवार, सुपे.
बारामती तालुक्यातील सुपे या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी महालक्ष्मी ज्वेलर्स या सोन्याचे दुकानात अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीसह सोन्या चांदीचे दुकान लुटण्याचा प्रयत्न केला होता, यावेळी पोलिसासह ग्रामस्थांनी हा प्रयत्न धुडकावला होता. यावेळी एक आरोपी ग्रामस्थ व पोलिसांना हाती लावला होता, परंतु त्यातील तीन आरोपी हे आपल्या गाडीसह फरार झाले होते. सुपे पोलीसांनी त्यातील दुसऱ्या आरोपीचा 24 तासामध्ये तपास लावत अहमदनगर येथील पाथर्डी या ठिकाणी त्याला पकडण्यात आलं होतं, असे मिळून दोन आरोपी पोलिसांनी 24 तासात पकडले.
या घटनेतील दोन मुख्य आरोपी फरार झाले होते. सुपे व वडगाव निंबाळकर पोलीसांनी दुसऱ्या आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर अखेर तिसरा आरोपीच्या ठिकाणाचा व संपर्काचा तपास पोलिसांना मिळाला. तांत्रिक तपासाद्वारे शिताफीने वडगाव निंबाळकरचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांच्या पथकाने खेडशिवापूरमध्ये हॉटेलमध्ये लपून बसलेल्या तिसऱ्या आरोपीला पकडले.
पोलिसांनी या तिसऱ्या आरोपीच्या शोधासाठी अक्षरशः दोन दिवस रात्रीचा दिवस केला.. तिसऱ्या आरोपीचा ठावठिकाणा पोलिसांना मिळाला, मग अगदी सिनेस्टाईल पद्धतीने रात्री दोन वाजता च्या सुमारास वडगाव निंबाळकर पोलीसांचे पथक त्या हॉटेलबाहेर सापळा रचून बसले आणि कोमल नितीन गौतम (वय 24, रा. माणेगाव पोस्ट ठाणे, जिल्हा गोंदिया) याच्या मुसक्या आवळल्या.
कोमल गौतम याच्याकडे धारधार शस्त्र, गॅस कटर, फेस मास्क, नोजमास्क, तीन लॅपटॉप, चांगल्या कंपनीचे मोबाईल, हॅन्डग्लोज तसेच नकाशे आदी साहित्य पोलिसांना मिळाले आहे अशी माहीती फौजदार सलिम शेख यांनी दिली ,
तीनही आरोपींना बारामती कोर्टामध्ये हजर करण्यात आले, त्यांना दहा दिवसाची पोलीस कोठडी तपासासाठी मिळाली आहे. यांनी आणखी कोठे गुन्हे केलेत का, याची माहिती मिळण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे.