पुणे : महान्यूज लाईव्ह
व्यवसायासंदर्भात मार्गदर्शन करावे असे म्हणत तरुणीने व्यवसायिकाशी ओळख वाढवली. ती व्हाट्सअप कॉल वर बोलणे करू लागली आणि व्यवसायाची बोलणी करायची म्हणून फ्लॅटवर बोलावून घेतलेल्या त्या व्यवसायिकाला पैसे दे, नाही तर आता तुझ्यावर बलात्काराची केस करेल अशी धमकी एका तरुणीने दिली. त्यानंतर हे प्रकरण आपल्याकडे आल्याचे सांगून वकिलाने 16 लाख रुपयांना लुबाडले. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी विक्रम भाटे नावाच्या वकिलाला अटक केली असून, हनी ट्रॅप करणाऱ्या निधी या वाघोलीतील 25 वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मगरपट्टा सिटी येथील एका 42 वर्षीय व्यवसायिकाने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली असून तीन ऑगस्ट 2022 ते मार्च 2023 पर्यंत घडलेल्या घटने संदर्भात या व्यवसायिकाने आपली 17 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित व्यावसायिक हा पुण्यातील सीजन मॉल येथे गेल्यानंतर एक तरुणी त्याच्याजवळ आली आणि लाईटर मागण्याच्या पाहण्याने या व्यवसायिकाशी बोलणे करत आपल्याला एका बिजनेस संदर्भात मार्गदर्शन करावे अशी विनंती केली. त्यानंतर तिने मोबाईल नंबर मागून घेऊन या व्यवसायिकाशी ओळख वाढवली.
७ नोव्हेंबर २०२२ रोजी या तरुणीने या व्यवसायिकास वाघोलीतील सदनिकेवर बोलावले आणि या व्यवसायिकाशेजारी बसून चार-पाच फोटो काढले आणि ड्रेस बदलून येताच सरळ व्यवसायिकाला धमकी दिली. येथून चालत हो, अन्यथा मी तुझ्या विरोधात कायदेशीर कारवाई करीन अशी या महिला तरुणीने व्यवसायिकाला धमकी दिली. त्यामुळे घाबरून व्यवसाय करण्याची तिथून काढता पाय घेतला आणि या मुलीचा मोबाईल नंबर ब्लॉक करून टाकला.
त्यानंतर आठ दिवसांनी विक्रम भाटे या वकिलाने व्यवसायिकाला संपर्क साधून संबंधित तरुणीने तुमच्यावर तक्रार केली आहे, तुम्हाला जामीन मिळणार नाही. प्रकरण मिटवायचे असेल तर मी तुम्हाला मदत करतो असे सांगितले. त्यावरून व्यवसायिकाने एवढे पैसे नाहीत असे सांगून गळ्यातील सोन्याची चैन, लॉकेट असे सहा तोळ्याचे दागिने मुथूट फायनान्स मध्ये तारण ठेवून विक्रम भाटे या वकिलाला व्यवसायिकाला दिले.
त्यानंतर वेळोवेळी पैसे मागून या व्यवसायिकाची 17 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक संबंधित वकिलाने केली. दरम्यान हे सर्व रॅकेट असून ते लोकांना फसवत असल्याची माहिती या व्यवसायिका समजल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.