बारामती : महान्यूज लाईव्ह
आत्तापर्यंत शिक्षण आणि प्रत्यक्ष करिअर त्याचा कुठेच ताळमेळ जुळत नाही असे चित्र होते. आपण घेतलेल्या शिक्षणाचा प्रत्यक्ष नोकरीत काहीच उपयोग होत नाही असाही अनेकांचा सूर होता. मात्र शिक्षण हे व्यावसायिक दर्जाचं असावं आणि त्यातून भाकरीचाही प्रश्न सुटावा यावरती भर दिलेल्या बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या महाविद्यालयात फक्त एकच वर्षात २०० विद्यार्थ्यांना आतापर्यंत नोकरी मिळाली आहे.
विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील ५१ विद्यार्थ्यांची व
निवड पिरामल फायनान्स मुंबई या कंपनीत झाली आहे. तसेच इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठानच्या महाविद्यालयातील ३ विद्यार्थ्यांचीही निवड केली आहे.
१ मार्च रोजी झालेल्या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये महाविद्यालयाच्या 250 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. गुणवत्तेच्या आधारे त्यातून ५४ विद्यार्थ्यांची निवड झाली. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना २ लाख ४४ हजार रुपये वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
नुकतेच पिरामल फायनान्सचे शिष्टमंडळ विद्यार्थ्यांना ऑफर लेटर देण्यासाठी महाविद्यालयात दाखल झाले होते. या निमित्ताने यशस्वी झालेल्या सर्व ५४ विद्यार्थ्यांना पिरामल फायनान्स मुंबई येथून आलेल्या श्रीमती सिया व श्रीमती ईश्वरी यांनी सदर ऑफर लेटर्स निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बहाल केली. यावर्षी विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयातील एकूण २०० हुन अधिक विद्यार्थ्यांना विविध कंपन्यामध्ये नोकरी मिळाली.
विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सौ. सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, खजिनदार युगेन्द्र पवार, सचिव ॲड. नीलिमा गुजर, डॉ. राजीव शहा, श्री किरण गुजर, श्री मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. श्यामराव घाडगे व डॉ.लालासाहेब काशीद, संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी विशाल कोरे, महाविद्यालयातील प्लेसमेंट समितीचे समन्वयक गजानन जोशी, डॉ. जगदीश सांगवीकर व
महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.