भोर : महान्यूज लाईव्ह
अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाचे चिंतन शिबिर नुकतेच भोर येथील रामबाग येथील स्काऊट गाईड राज्य प्रशिक्षण केंद्रात पार पडले.
महासंघाच्या आतापर्यंतच्या कामाचा आढावा घेणे तसेच भविष्यातील दिशा ठरवणे यासाठी राज्यातील प्रमुख पदाधिकारी आणी कार्यकर्ते या चिंतन शिबिरासाठी आले होते. या शिबिरात संघाचे पुढील ध्येयधोरण कसे असावे, जुन्या धोरणांमध्ये काय बदल करावा याबाबत अनेक सूचना केल्या गेल्या. गेल्या अठरा वर्षाच्या कालावधीत राज्यस्तरीय वधु वर पालक परिचय मेळावे, कामगार मेळावे, उद्योजक तसेच कंपन्यांना एकत्रित आणून समाजातील युवकांसाठी रोजगार मेळावे आयोजित केले. विद्यार्थी गुण गौरव सोहळे, विविध क्षेत्रात नाव कमाविलेल्या समाजातील मान्यवरांचा सन्मान, महिला मेळावे, पुरग्रस्त भागात तसेच कोरोना काळात केलेली आर्थिक व धान्य स्वरुपाची मदत अशी अनेक चांगली कामे महासंघाकडून झाली आहेत. त्याचे कौतुकही केले गेले.
भविष्यात शासनदरबारी मागण्या मागण्या मांडण्यासाठी राज्यातील सुतार बांधवांचे अधिवेशन घेण्यासंदर्भातही चर्चा झाली. २ एप्रिल रोजी आळंदी येथे समाजाची मिटींग होणार आहे, यामध्ये इतर समविचारी समाज संघटनांच्या सहयोगाने याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
यावेळी हभप राजेंद्र महाराज शास्त्री यांचे समाज प्रबोधनपर व्याख्यान झाले तसेच झी मराठी कॉमेडी कार्यक्रमातील विजेता हरीश धोंगडे याच्या विनोदी मनोरंजात्मक कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष हनुमंतराव पांचाळ, कार्याध्यक्ष गणपतराव गायकवाड ,उपाध्यक्ष भगवान श्राद्धे ,मोहन भिकोबा यादव ( वेल्हा तालुका अध्यक्ष), प्रहार संघटना भोर तालुका उपाध्यक्ष सचिन नवघणे व टिटेघरचे शाखा अध्यक्ष हनुमान सुतार, दत्तात्रय सुतार, शिवाजीराव सुतार ,सुरेश भालेराव, रवींद्र रायकर, कृष्णा तामकर, अशोक आनंदे, बाळासाहेब गरुड, विद्यानंद मानकर,किशोर कदम, वीरेंद्र भालेराव, हनुमंत सुतार, अधिकराव सुतार, पोपट तामकर, विजय तामकर, किरण देशपांडे, सोमनाथ भागवत, हनुमंत तामकर, आदेश गरुड,पांडुरंग निगडे भिकू निगडे ( मा.जि.प. सदस्य ), निकिता रायकर, मनीषा तामकर ,पूजा तामकर, शितल गायकवाड, गायत्री क्षीरसागर, मनीषा सुतार आदी राज्य, जिल्हा, तालुका पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भोर तालुका सुतार समाज महासंघाचे अध्यक्ष कृष्णा तामकर यांनी केले, सूत्रसंचालन विनायक सुतार तर आभार सुरेश सुतार यांनी व्यक्त केले