विक्रम वरे महान्यूज लाईव्ह
बारामती – बारामती परिसरात गेली आठ वर्षे सातत्याने शेतकरी आणि ग्राहक यांना थेट एकमेकांसमोर आणून शेतातून ग्राहकांच्या दारात धान्य पुरविण्याचा अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र आणि शारदा महिला संघ व कृषी उत्पन्न बाजार समिती बारामतीचा धान्य महोत्सव आता ९ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.
बारामतीतील रयत भवन येथे ७ ते ९ एप्रिल रोजी या धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीचा हा नववा धान्य महोत्सव आहे. सकाळी ९ ते रात्री ८:३० या वेळेत हा धान्य महोत्सव खुला राहणार आहे.
घरगुती वापरासाठी वर्षभर लागणारे गहू, तांदूळ, ज्वारी, कडधान्य, डाळी, बाजरी, काजू, बदाम, हळद, मशरूम, दुधाचे प्रक्रिया पदार्थ इत्यादी शेतातून थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. .
गहू -(एचडी 2189, लोकवत,खपली आणि त्र्यंबक) तांदूळ – भोर,वेल्हा, जुन्नर,रत्नागिरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा(इंद्रायणी, रत्नागिरी 24 आणि काळा भात)ज्वारी-(मालदांडी दगडी,रेवती आणि वसुधा) भरडधान्य- (नाचणी, वरई तांदूळ बाजरी, राळा, सावा इत्यादी प्रकारचे व त्याचे प्रक्रिया पदार्थ) या व्यतिरिक्त कडधान्य- (मटकी, चवळी, हुलगा, तूर डाळी, हरभरा) तसेच घाण्याचे तेल, देवगड हापूस आंबा, मनुके इत्यादी एकाच छताखाली या सर्व जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत.