जुन्नर : महान्यूज लाईव्ह
नगर कल्याण महामार्गावर लवणवाडीमध्ये दुचाकी वरील प्रवाशांना पीकअप जीपने अचानक धडक दिल्याने तब्बल पाच जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. रात्रीच्या अंधारात ही घटना घडली.
नारायणगाव येथील शेतातून वेगवेगळ्या ठिकाणी शेतमजुरी काम करणारे हे मजूर होते आणि ते संध्याकाळी काम करून दुचाकीवरून घरी चालले होते. रात्रीच्या अंधारात समोरून आलेल्या भरगाव जीपने या दुचाकींना ठोस दिली.
दरम्यान अपघातानंतर मदत करणाऱ्या लोकांना जीभचा चालक मध्य धुंद अवस्थेत असल्याची दिसले त्यामुळे नागरिकांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली हे सर्व मजूर पारनेर तालुक्यातील पळशी वनकुटे या गावचे होते.