बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती आणि तालुक्यात विविध ठिकाणी शेकडो कोटींची विकास कामे सुरू आहेत. यादरम्यान जी आतापर्यंत कुजबूज आणि चर्चा सुरू होती, त्यालाच नेमका अजित पवार यांनी आज हात घातला. अजित पवार यांच्याकडे आलेल्या तक्रारीमध्ये एक तक्रार ठेकेदारांशी संबंधित होती. त्यावरून अजितदादांनी चांगलेच सुनावले.
अजितदादा म्हणाले, पदाधिकारी अथवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात देखील बसावे. वेळ द्यावा. तेथे बसून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावावेत. मात्र दुसऱ्यांचा मोकळ्यात वेळही घेऊ नका. कोणीही नागरिक अथवा तक्रारदार आपल्याकडे तक्रारी किंवा घराणे घेऊन आल्यानंतर त्याला लागलीच कामे मार्गी लावून मोकळे करा. फार वेळ थांबू देऊ नका.
दरम्यान काही पदाधिकारी जेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी किंवा नागरिकांशी बोलत असतात, तेव्हा अचानक एखादा ठेकेदार आला तर त्याला बाजूच्या केबिनमध्ये घेऊन जातात. हा प्रकार शोभनीय नसल्याची तक्रार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याकडे केली होती,
त्याचा उल्लेख करत अजित पवार यांनी कोणालाही ताटकळत ठेवू नका. ठेकेदाराला घेऊन दुसऱ्या केबिनमध्ये बसू नका. अनेक ठेकेदार माझे ओळखीचे आहेत. परंतु ठेकेदाराला ठेकेदाराच्या जागेवर ठेवा असा सल्ला देत चांगलेच कान टोचले. त्यामुळे कार्यक्रमानंतर देखील अजित दादांच्या या धारदार इशाऱ्याची चर्चा बराच काळ सुरू होती.