बारामती – महान्यूज लाईव्ह
नारोळी गावचा उपसरपंच दत्तात्रेय ढमे याच्यावर ग्रामपंचायत कार्यालयासमोरच्या आवारात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा महिला कर्मचाऱ्याने दाखल केला असून या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना २३ मार्च रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. नारोळी गावच्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपसरपंच ढमे याने जुन्या बांधलेल्या गाईगोठयाचे मस्टर काढण्याच्या कारणावरून महिला कर्मचाऱ्यास दमदाटी केली व ऑफिसचे दप्तर ओढून सरकारी काम करू दिले नाही. संबंधित महिला कर्मचारी कार्यालयाच्या बाहेर आल्यानंतर ढमे याने मागून येऊन उजवा हात पकडून लज्जास्पद वर्तन केले.
त्यावरून संबंधित महिला कर्मचाऱ्याने वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या गुन्हयाचा पुढील तपास फौजदार शेख करीत आहेत.